Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पर्वातील स्पर्धक आणि त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काल 'चान्स पे डान्स' या उपकार्यात टीम A विजयी ठरली. आज बिग बॉसच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. तसेच या पर्वातील पहिलं कॅप्टन्सी कार्यदेखील पार पडणार आहे.
कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्याचे उमेदवार?
चौथ्या पर्वातील पहिल्या साप्ताहिक कार्यात टीम A ने विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. तर कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीमधून किरण माने, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे आणि रोहित शिंदे हे सदस्य एलिमनेट झाले. त्यामुळे आता कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्याचे उमेदवार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
आजच्या भागात 'बिग बॉस' सदस्यांना सांगणार आहेत,"आज बिग बॉसच्या घरात पडणार आहे पैशाचा पाऊस, आणि या पाऊसाचा आनंद लुटणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे पहिले कॅप्टन पद मिळवण्याचा बहुमान. आपल्यासोबतच अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे हे बघण्यासाठी बिग बॉस मराठी सिझन चारच पहिला कॅप्टन कोण होईल. त्यामुळे सुरु करूया बिग बॉस मराठी सिझन चारचे पहिले कॅप्टन्सी कार्य".
कोण आहे हा पप्पू ? "पप्पू द भांडी घाश्या"
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अपूर्वा, अक्षय, रुचिरा, रोहीत हे सदस्य कोणा एका सदस्यबद्दल गॉसिप करताना दिसणार आहेत. अपूर्वाचं म्हणणं आहे "माझी तर मनापासून इच्छा आहे किचनचं कामं ना पप्पूकडे आलं पाहिजे”. त्यावर अक्षय म्हणाला, चूक आहेस तू साफ सफाई देऊया... कसं आहे बघ मला असं वाटतं, जेवण आहे ना ते उत्तम व्यक्तीलाच देऊयात. सगळयांचं म्हणणं आहे भांडी घाश्या बनवू त्याला. त्यावर अपूर्वा, रोहित यांचे कंमेंट सुरु झाले, कोण आहे हा पप्पू कळेलच लवकर ... अपूर्वा म्हणाली, " हा माणूस येतो, डिनर टेबलवर खातो आणि निघून जातो... ".
संबंधित बातम्या