Punyashlok Ahilya Bai : देवी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य, सुजाणपणा आणि धैर्य हे पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरले आहे. अहिल्याबाईंचा जीवनपट उलगडून दाखवणार्‍या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ (Punyashlok Ahilya Bai) या भव्य मालिकेत अशा सम्राज्ञीचे जीवनचरित्र मांडले आहे, जिने आपल्या निष्पक्ष वृत्तीने समाजात शांतता आणि समृद्धी प्रस्थापित केली आणि हे दाखवून दिले की, माणूस जन्माने नाही; तर त्याच्या कर्तृत्वाने महान ठरत असतो. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर अहिल्याबाई होळकरांनी महिलांचे अधिकार, त्यांचे शिक्षण आणि सक्षमीकरण यासाठी अपार कार्य केले.


‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ मालिकेतील आगामी भाग ‘दत्तक विधान अध्याय’ उलगडून दाखवतील, जो अहिल्याबाईंच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्की टीव्हीच्या पडद्याशी खिळवून ठेवेल. या कथानकात, आपल्या काळाच्या खूप पुढचा विचार करणार्‍या अहिल्याबाई एका विधवा स्त्रीला एक मूल दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतील. ज्या काळात दत्तक विधानाकडे समाज आठ्या घालून पाहात असे, तोच हा काळ होता.


त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं!


या मालिकेत अहिल्याबाईंची भूमिका समर्थपणे साकारणारी अभिनेत्री ऐतशा संझगिरी या अध्यायाविषयी स्वतःचे मत मांडताना म्हणते, ‘अहिल्याबाई होळकरांनी समाजात अनेक क्रांतीकारी आणि ऐतिहासिक बदल घडवून आणले, विशेषतः महिलांच्या बाबतीत. या महान स्त्रीचे चरित्र साकारण्याच्या मला मिळालेल्या संधीतून मी एक स्त्री म्हणून बरेच काही शिकते आहे. अनेक महिलांसाठी, मग त्या कोणत्याही काळात जन्मलेल्या असोत, अहिल्याबाई एक आदर्श आहेत. त्यांच्या जीवनात अशा असंख्य घटना आहेत, ज्या अत्यंत प्रेरणादायक आहेत. पण मला सर्वाधिक भिडलेली कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे निपुत्रिक विधवांना मूल दत्तक घेऊन कुटुंबात आणि समाजात स्वतःचा सन्मान टिकवण्यासाठी त्यांनी केलेली मदत! मालिकेच्या आगामी भागांमध्ये दत्तक विधानाचा प्रसंग खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आला आहे. मला आशा आहे की, या उपक्रमाचा आपल्या समाजावर किती व्यापक प्रभाव पडला, याची जाणीव प्रेक्षकांना होईल.’


महत्वाच्या बातम्या :