Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता नव्या घडामोडी घडणार आहेत. सागर आदित्यला पूर्ण दिवस वेळ देणार आहे. तर, दुसरीकडे आदित्यचा वापर करून सावनी सागर-मुक्तावर निशाणा साधणार आहे. स्वातीने चहातून दिलेल्या औषधातून मुक्ताला अॅलर्जी होणार आहे. इंद्रा मुक्ताला कार्तिकची माफी मागण्यास सांगते. आता, मुक्ताला स्वातीचा कट समजेल का, आदित्यचा वापर होत असल्याचे सागरच्या लक्षात येणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहे
आदित्यला सागर घरी बोलावतो. आदित्यही राजी होतो. डेटला जाण्याचा प्लान रद्द करून आदित्यला भेटण्यास प्राधान्य दिल्याने सागर मुक्ताचे आभार मानतो. आदित्य सावनीला पप्पा मलाच प्रायोरिटी देतात असे सांगतो. त्यावर सावनी तुझा कॉन्फिडन्स मोडणार असल्याचे मनात ठरवते.
स्वातीने दिलेल्या औषधाचा मुक्तावर होणार परिणाम...
स्वातीने चहातून दिलेल्या औषधाने मुक्ताच्या अंगावर चट्टे उठतात. मुक्ताची चिंता वाढते. अचानकपणे अंगावर चट्टे आल्याने मुक्ता चिंतेत पडते आणि ती सागरला याबाबत सांगते. सागरही मुक्ताला काहीतरी अॅलर्जी झाली असेल असे सांगते. त्यावर मुक्ता मला आतापर्यंत कधीही अॅलर्जी झाली नसल्याचे सांगते. सागर तिला आपण डॉक्टरकडे जाऊयात असे सांगतो.
आदित्य घरी येणार, मुक्ताला पाहून चेहरा पडणार...
सागर-मुक्ता दोघेही डॉक्टरकडे जाण्यासाठी निघतात तेव्हा दारात आदित्य उभा असतो. आदित्य तुम्ही दोघे बाहेर जाताय का असे विचारतो, त्यावर सागर आम्ही डॉक्टरकडे जातोय असे सांगतो. त्यावर आदित्यचा चेहरा पडतो. मुक्ता सागरला आदित्यसोबत घरी थांबण्यास सांगते. सागर मुक्ताला एकटी डॉक्टरकडे सोडण्यास तयार नसतो. सागर मिहिरला मुक्तासोबत डॉक्टरकडे पाठवतो.
आदित्यमुळे घरात आनंदाचे वातावरण...
आदित्य घरी आल्याने कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. इंद्रा आदित्यसाठी चिंबोरीचे कालवण, गाजरचा हलवा बनवते. आदित्यला जेवण आवडते. सागरसोबत चांगला दिवस गेल्याने आदित्यही खूश असतो. पूर्ण दिवस दिल्याने आदित्य सागरचे आभार मानतो. त्यावर सागर त्याला माझा सगळा वेळ तुझाच आहे. तू सांगशील तेव्हा मी सोबत असेल असे सागर सांगतो.
घरात आनंदाचे वातावरण असते. आदित्य घरी निघताना मुक्ता घरी येते. मुक्ताला पाहून आदित्यचा चेहरा पडतो.
स्वातीला होणार आनंद...
मुक्ताला दारात पाहून सागर तिला डॉक्टर काय म्हणाले असे विचारतो. मुक्ता डॉक्टरकडे गेल्याचे पाहून बापूंना आश्चर्य वाटते. ते तिला कारण विचारतात त्यावर अंगावर चट्टे उठल्याने डॉक्टरकडे गेली असल्याचे सांगते. मुक्ताच्या शरीरावर चट्टे पाहून स्वातीला मनात खूप आनंद होतो. नवऱ्याला तुरुंगात धाडल्याचा सूड स्वाती घेत असते.
सावनीचा आदित्यच्या खांद्यावरून सागर-मुक्तावर निशाणा...
आदित्य घरी आल्यावर सावनीला पप्पाने मला प्रायोरिटी दिली असल्याचे आनंदाने सांगतो. त्यांनी त्यांच्या नव्या बायकोऐवजी मला प्राधान्य दिले असल्याचे आदित्य सांगतो. आदित्य सावनीकडे आपण पुन्हा एकत्र का राहत नाही असे विचारतो. सावनीदेखील आदित्यच्या सूरात सूर मिसळते आणि मी जुनं सगळं विसरून सोबत राहण्यास तयार आहे, असे सांगते. सागरला मुक्ताला घटस्फोट देण्यास सांग असे सावनी आदित्यला सांगते.
इंद्राची विनंती मुक्ता नाकारणार...
इकडं कार्तिकच्या आठवणीने स्वाती आपल्या बेडरुममध्ये भावूक झालेली असते. इंद्रा हे सगळं पाहते आणि माघारी फिरते. हे पाहून इंद्राच्या जीव कासावीस होतो. इंद्रा मुक्ताकडे माफी मागते. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता असे म्हणते. मी देखील आई आहे, स्वातीचा असा चेहरा पाहून मला वाईट वाटते असे इंद्रा सांगते. इंद्रा मुक्ताला कार्तिकची माफी मागण्यास सांगते. जेणेकरून पोलीस त्याला सोडतील आणि स्वातीचा संसार पुन्हा सुरळीत होईल असे सांगते. पण मुक्ता त्याला नकार देते. मुक्ता इंद्राच्या मागणीला नकार देते. त्यावर इंद्रा संतापते आणि मुक्ताला इशारा देते.