Premachi Goshta Marathi Serial Updates : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. सागर आणि मुक्तामध्ये आलबेल नाही. तर, दुसरीकडे सावनी आणि हर्षवर्धन सागरविरोधात नवा कट रचणार आहे. या कटात आता कोळी कुटुंबाचा जावई कार्तिक साथ देणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये काय पाहता येणार?
सागरने सुनावल्याने इंद्राची चिडचिड
मुक्ताला सतत बोल लावत असल्याने सागर इंद्राला सुनावतो. सागरची बोलणी ऐकल्याने इंद्रा चिडते आणि भावूक होते. मुक्ता सागरला तयार होण्यासाठी मदत करत असते. सागर आणि मुक्तामध्ये आलबेल नसल्याचे कार्तिकच्या लक्षात येते. कार्तिकची मुक्तावर वाईट नजर पडली असते.
मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न
कार्तिक मुक्ता-सागरच्या बेडरुममध्ये शिरतो. मुक्ताचा हात पकडून इंद्रा जे बोलली त्याचे वाईट वाटून घेऊ नका असे कार्तिक म्हणतो. कार्तिक मुक्ताचा सतत हात पकडून बोलत असतो. मुक्ताला याचा राग येतो. मी या घरचा जावई आहे. जावई असल्याचा फायदा असून मला कोणी काही बोलू शकत नाही. त्यामुळे काही अडचण असेल तर मला सांगा असे बोलत कार्तिक लगट करण्याचा प्रयत्न करतो. मुक्ता त्याचा हात झटकून क्लिनिकला जाण्यासाठी निघते.
सावनी हर्षवर्धनचा तिळपापड
सागरला प्रोजेक्ट मिळाल्याने सावनी-हर्षवर्धनचा तिळपापड होतो. हर्षवर्धन-सावनी हे सागरला प्रोजेक्ट कसा मिळाला असे विचारतात. पण, कॉन्ट्रॅक्ट सागरच्या कंपनीला मिळतात. याप्रोजेक्टसाठी सावनी-हर्षवर्धनने सागरला फॉलो करण्याचा सल्ला देण्यात येतो. नाइलाजाने सावनी सागर सोबत काम करण्याचा सल्ला मान्य करते. सागर पहाटे चार वाजता ऑफिसमध्ये मिटिंगला येण्यास सांगतो.
सागरविरोधात सावनीचा नवा डाव, घरात पाडणार फूट
प्रोजेक्टसाठी होकार दिल्याने हर्षवर्धन हा सावनीवर चिडतो. आता मला जे करायचे आहे ते करू देत असे सावनी हर्षवर्धनला सांगते. सागरला आपण नाचवू असे सावनी हर्षवर्धनला सांगते. यावेळीही डाव फसल्यास तुझ्याशी लग्न करणार नसल्याचे हर्षवर्धन सांगतो. सावनी हे आव्हान स्वीकारते. सागरच्या कुटुंबातील व्यक्ती मुक्ता-सागर विरोधात असणार असल्याचे सावनी सांगते. सागर-मुक्तामध्ये वितुष्ट येऊन मुक्ताच घर सोडून जाईल असे सावनी सांगते. त्यावेळी कार्तिक तिथे येतो. सावनी ही हर्षवर्धनला कार्तिकची ओळख करून देते.
आरती मुक्ताला सांगणार घडलेला प्रसंग
क्लिनिकमध्ये आरती येते. मुक्ता तिची विचारपूस करते. त्यावेळी आरती तो माणूस तुमच्या बिल्डिंगखाली भेटला असे सांगते. मुक्तालाही धक्का बसतो. मुक्ता आरतीला धीर देते आणि त्याला घाबरून न जाण्याचा सल्ला देते. पोलिसांत तक्रार केल्यास त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यावर आईची आणि घरची जबाबदारी असल्याचे आरती सांगते. त्यावर मुक्ता आरतीला धीर देते.