Premachi Goshta Serial Update :  मुक्ता बेशुद्ध असल्याने सागरचा जीव कासावीस होतो. त्या परिस्थितीतही सावनी मुक्ताच्या नावाने बोटं मोडत असते. सागर सावनीला  भूतकाळातील गोष्टींवरून तिला आरसा दाखवतो. तर दुसरीकडे मुक्ता शुद्धीत येते. 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय पाहाल?


सागर सावनीला भूतकाळाची आठवण करुन देणार


मुक्ता बेशुद्ध असल्याने आणि तिच्यासाठी पुढील काही महत्त्वाचे असल्याने सागरच्या जीवाची घालमेल सुरू असते. सावनी सागरसमोर मुक्ताविरोधात बडबड करत असते. सागर आपल्या रागावर नियंत्रण ठेवून सावनीला सुनावतो. मुक्ता खरंच मूर्ख आहे, स्वत:ला एवढा त्रास होत असताना तिने माझ्यासाठी उपवास धरला. मला दीर्घायुष्य मिळावे यासाठी तिने उपवास केला असल्याचे सागर म्हणतो. हा त्याग आहे. या गोष्टी तुला काही माहित नसतील. तुला त्याग नाही फक्त सोडणं माहीत आहे. ज्या गोष्टीची सुरुवात करते त्या गोष्टी सोडते. जी माणसं प्रेम करतात त्यांना सोडतेस. त्याग हा वरच्या पातळीचा असल्याचे सागर सांगतो. मुक्ता माझ्या आयुष्यात आल्यानंतर तुझ्यातील आणि त्यांच्यातील फरक क्षणोक्षणी दिसून येत आहे. मुक्ताला त्रास होत असूनही त्यांनी उपवास धरला. पण, तुला त्रास होत नसतानादेखील तू उपवास केला नाही असे सागर सावनीला सुनावतो. सावनीला जुने दिवस आठवतात. 


मी तुझ्या प्रेमात मुर्खासारखं आकंठ बुडालो होतो. पण मुक्ता आयुष्यात आली आणि प्रेम, जिव्हाळा हे सगळं समजले असल्याचे सागर सांगतो. मुक्ताने मला आणि माझ्या घराला एकत्र बांधून ठेवले असल्याचे सागरला सांगतो. त्यावर सावनी सांगते की, मला जे हवंय ते मला मिळालं, तुला जे हवयं ते तुला मिळालं असल्याचे सावनी सांगते. सागर यावर तिला सुनावतो. 


स्वाती देणार सागरला धीर


मुक्ताची अवस्था पाहून सागरचा जीव कासावीस होतो. सागरची ही अवस्था स्वातीलादेखील पाहावत नाही.  आपण काळजी घेऊयात, चांगले उपचार देऊयात असे सांगते. सईदेखील मुक्ताई स्ट्राँग आहे. तिला काहीही होणार नाही. देवबाप्पाही काहीही होऊ देणार नाही असे सांगते.


सागरच्या प्रार्थनेला यश, मुक्ता शुद्धीवर येणार


सागर मुक्ताच्या चांगल्या प्रकृतीसाठी एकवीरा देवीकडे गाऱ्हाणे घालतो. हे पाहून सावनीला धक्का बसतो. सागरला द्वेष करताना पाहिले,  आता मुक्तासाठी एवढं करतोय असे सावनी मनात म्हणते. तिकडे मुक्ता शुद्धीत येते. देवी आईने तुझं ऐकले असून मुक्ताला शुद्ध आली असल्याचे स्वाती सागरला सांगते. स्वातीचे बोलणं ऐकताच सागरला आनंद होतो. त्याच वेळी तिथे आदित्यदेखील असतो. मी मघाशी काळजीत होतो, त्यामुळे तुला काही उलटसुलट बोलल्यास माफ कर असे सागर आदित्यला बोलतो. त्यावर आदित्यही तुम्ही चिंतेत होता हे लक्षात आलं 


मुक्ता घरी आल्यानंतर माधवी तिची काळजी घेते. तब्येतीची काळजी घेण्याबाबत माधवी मुक्ताला सांगते.