Premachi Goshta Serial Update : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिका आता वेगळ्या वळणावर आली आहे. तुरुंगातून सागरच्या सुटकेसाठी मिहिर मोठा निर्णय घेणार आहे. त्यामुळे सागर तुरुंगातून बाहेर येतो. पण मिहिरसाठी त्याची धडपड सुरू होते. दुसऱ्या बाजूला सावनीच्या नेहमीच्या षडयंत्राला वैतागून मुक्ता तिच्या घरी जाते आणि सुनावते. 


सागरसाठी मिहिर घेणार मोठा निर्णय


मिहिर सागरसाठी स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन तस्करी केलेले सोनं आणि रोख रक्कमेची बॅग माझीच असल्याचे सांगतो. पोलीस मिहिरला तुरुंगात टाकतात. सागर मिहिरला असा खोटा आळ स्वत:वर का घेतला असे विचारतो. तू तुरुंगात जाऊ नकोस असे सांगतो. या दोघांमध्ये वाद होतो, तेवढ्यात पोलीस दोघांवर ओरडतात आणि सागरला तुरुंगातून बाहेर काढतात. तुला मी तुरुंगात राहू देणार नसल्याचा शब्द सागर मिहिरला देतो.


कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण, सागरच्या चेहऱ्यावर चिंता


इकडं घरी सागरची सुटका झाल्याचे समजताच कोळी कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते. देवाचे आभार मानले जातात. सागर घरी आल्यावर त्याला ओवाळून त्याचे स्वागत केले जाते. मात्र, सागरचा चेहरा पडलेला पाहून मुक्ताच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तू बाहेर कसा आलास असे बापू सागरला विचारतात. त्यावर मिहिरने माझ्यावरील आरोप स्वत: वर घेतले असल्याचे सांगतो. मी त्याला तुरुंगातून बाहेर काढणार असल्याचे सागर सांगतो. 


मिहिर तुरुंगात गेल्याने सागर-मुक्ताला वाईट वाटते. सागरची चिडचिड होत असते. त्यावर मुक्ता आपण मिहिरला सोडवू असे सांगते. सागर स्वस्थ बसत नाही. 


 सावनीला मुक्ता सुनावणार


सागर तुरुंगात सुटल्याचे समजताच सावनीचा तिळपापड होतो. तो कसा सुटला असा प्रश्न तिला पडतो.


मुक्ता सावनीच्या घरी जाते आणि तिला सुनावते. तू तुझ्या आवडीच्या माणसासोबत राहते आहेस ना मग सागरचा पिच्छा का सोडत नाहीस? कोणतीही कुरकुर न करता ते तुझ्या आयुष्यातून बाजूला झाले तरीही तू त्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीस असे सुनावते. तुझे काही प्रॉब्लेम क्रिएट करतेस त्यामध्ये नेहमीच तुझीच माणसं अडकतात हे तुला का कळत नाही? तू सागरला त्रास देण्यासाठी नेहमी खड्डे खणत राहतेस पण त्यात नेहमी तुझीच माणसं अडकतात. कधी सई, कधी आदित्य तर कधी मिहीर.  मिहीरने म्हणजेच तुझ्या सख्ख्या भावाने सागरचा आरोप स्वत:वर घेतला असल्याचे मुक्ता सावनीला सांगते. 
 


मिहिर तुरुंगात असल्याने सागर तणावात आहे. आता तू आणि तुझा मित्र दोघेही सेलिब्रेट करा असेही मुक्ता सावनीला सांगते. मिहिर आमचा आहे, आमच्या कुटुंबातील सदस्य आहे, त्याला तुरुंगातून बाहेर काढणार असल्याचे मुक्ता सावनीला सांगते. मुक्ताने सुनावल्यानंतर सावनीच्या मनात मिहिरबाबत काळजी वाटते. हर्षवर्धनला सावनी मिहिरला तुरुंगातून बाहेर काढायला पाहिजे असे सांगते. मात्र, हर्षवर्धन नकार देतो. आपण सागरला अडकवण्यासाठी हे सगळं केले. पण, मिहिरला कोणी स्वत:वर आरोप घेण्यास सांगितले असे हर्षवर्धन सावनीला विचारतो.