Premachi Goshta Serial Update : सावनीकडून लग्नाच्या मागणीसाठी होत असलेल्या तगद्याला हर्षवर्धन वैतागला आहे. ही कटकट संपवण्यासाठी तो सावनीला अट सांगतो. आता, त्यासाठी सावनी मिहिरकडे येते. सावनीच्या विनंतीचा मिहिर विचार करणार का, सावनीच्या विरोधात हर्षवर्धनचा प्लान फसणार का, मुक्ता मिहिरची समजूत काढणार का? आदी प्रश्नांची उत्तरे 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये मिळणार आहेत. 


सावनीची मिहिरला हात जोडून विनंती


हर्षला माझ्यासोबत खरंच लग्न करायचे आहे. पण, त्याची अट एकच आहे ती म्हणजे तुझा भाऊ माझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन यावं अशीच अट आहे. त्यासाठी सावनी घायकुतीला येते, मिहिरच्या हातापाया पडत विनंती करते. मिहिर सावनीला नकार देतो. ज्या हर्षने तुझा संसार मोडला त्याच्यासोबत संसार थाटण्याची स्वप्ने पाहते असे मिहिर बोलतो. तुझ्या वागण्याने सागर दादूस कोलमडून पडला होता. क्षणाक्षणाला तुटताना पाहिले. त्याला माणसात आणले, स्वत:वर प्रेम करू लागला ते माझ्या मुक्ता या बहिणीमुळेच असे मिहिर सावनीला सांगतो. 


हर्षवर्धनचा सावनीला टोमणा...


घरी आल्यावर हर्षवर्धन सावनीला मिहिर सोबत न आल्याबद्दल टोचून बोलतो. कुठे आहे तुझा भाऊ? मोठ्या तोऱ्यात मगाशी गेली होतीस मला वाटलं आता बँड बारात घेऊनच येशील असं वाटलं होतं, असे हर्षवर्धन सावनीला म्हणतो.


मुक्ता घालणार मिहिरची समजूत


इकडे मुक्ता मिहिरची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. बहिण-भावाच्या नात्यातील भाव मुक्ता मिहिरला समजावून सांगते. सावनीमुळे मला त्रास झाला. नाती-प्रेम या शब्दांवरील विश्वास सावनीमुळे उडून गेला होता. पण नशीब चांगले होते म्हणून सागर दादूसमुळे मला मिहिका  भेटली  आणि नाती-प्रेम या शब्दावरील विश्वास पुन्हा एकदा बसला असल्याचे मिहिर सांगतो. मुक्ता ही मिहिरला वेगवेगळी उदाहरणे देत सावनीच्या लग्नासाठी बोलणी करण्यास भाग पाडते.


हर्षवर्धनच्या आनंदावर पाणी फेरणार मुक्ता-मिहिर


तर, सावनीकडून आता लग्नाची कटकट दूर होणार म्हणून हर्षवर्धन आणि सत्यम सेलिब्रेशन करत असतात. सावनीकडून सतत लग्नाची मागणी होत असल्याने डोक भिरभिर करते.  गेली सहा वर्ष नुसती भूणभूण लावली आहे. तिचा नुसता आवाज जरी आला तरी मी आत्ताच तो सहन करू शकत नाही. पुढे आयुष्यभर कसे सहन करणार असे हर्षवर्धन सत्यमला सांगत असतो. 


अटींमुळे तुझं सावनीसोबत लग्न होणार नाही असे  सत्यम सांगत असतो.तेवढ्यात मिहिर आणि मुक्ता हर्षवर्धनच्या घरी येतात. त्यांना पाहून हर्षवर्धनला धक्का बसतो.  सावनीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी मी यावं अशी तुझी इच्छा होती, तर मी आलो आहे असे मिहिर हर्षवर्धनला सांगतो. मिहिरला पाहुन सावनीला आनंद होतो. माझ्यासोबत माझे कुटुंब असल्याचे सावनी सांगते.