Premachi Goshta Serial Update :  माधवीच्या अपघातासाठी आपणच जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतर तुरुंगात जावं लागेल या भीतीने आदित्य घर सोडतो. आदित्य घर सोडून गेल्यानंतर इंद्रा, सावनी मुक्ताला नको-नको ते बोलतात. त्यानंतरही मुक्ता आदित्यला शोधते आणि जीव वाचवते. आदित्य आपला गुन्हा मान्य करणार का, आदित्यचे सत्य सागर सांगणार का, मुक्तासमोर सगळी परिस्थिती उलगडली जाणार का, आदी प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 'प्रेमाची गोष्ट'(Premachi Goshta)  मालिकेत मिळणार आहे. 


सावनी-इंद्राचे मुक्तावर उलटसुलट आरोप...


घरात आदित्य नसल्याचे पाहून घरातील चिंतेत पडतात. सगळेजण आदित्यला शोधण्यासाठी धावपळ करतात. सागर, मुक्ता, लकी सगळीकडे चौकशी करतात. पण, आदित्य दिसत नाही. तेवढ्यात सागरला सावनीचा फोन येतो. बोलण्याच्या ओघात सागर आदित्य हरवला असल्याचे सावनीला सांगतो. त्यानंतर घरी आल्यावर सावनी मुक्तावर नको ते आरोप करते. माझ्यावरील राग काढण्यासाठी मुक्ताने आदित्यला काही केले असेल असे म्हणते. इंद्रादेखील मुक्ताला आदित्य कुठे आहे विचारते. तू आदित्यला आपलं कधी मानलं नसल्याचे सांगते. इंद्राच्या बोलण्यावर बापू नाराजी दर्शवतात आणि वेळ काय, बोलतेय काय? कौन्सिलिंगच्या नावाखाली आदित्यला इथे आणलं असे सावनी म्हणते. बारशाचा कार्यक्रम संपल्यावर आदित्यला थांबवले असे सावनी म्हणते. त्यावर मुक्ता सगळ्यांसमोर आणि  तुझ्या परवानगीने आदित्यला थांबवले असल्याचे सांगते.  मुक्ता कधी आई होऊ शकत नाही त्यामुळे तिला आईचे दुःख काय असतं हे कधीच समजणार नाही असे सावनी सांगते.


सावनीला सागर सुनावणार


मुक्तावर आरोप होत असताना सागर घरात येतो. मुक्तावर होत असलेले आरोप सागरला मान्य नसतात. फक्त मुलं जन्माला घातले म्हणजे कोणी आई होत नाही असे सागर सावनीला बोलतो. मुक्ताने कधीही मुलांमध्ये भेदभाव केला नाही. मुक्ताने सईप्रमाणे आदित्यवरही प्रेम केले. आदित्यला कधीही परकं मानलं नाही. आपल्या मुलावर चांगले संस्कार जी बाई करू शकत नाही तिने आईपण मीरवू नये अशा शब्दात सागर सावनीला खडसावतो. अशा कठीण परिस्थितीत तोंड कमी आणि डोक जास्त चालवावं अशी ताकीद सागर मुक्ताला देतो.


मुक्तामुळे आदित्य सापडला... 


आदित्य कुठं गेला असावा याची चर्चा होत असताना मुक्ताला अचानकपणे आठवते की वॉचमनन टेरेसवर पाण्याची टाकी भरायला गेला होता. त्यानंतर ती लगेच तिथे जाते. त्यावेळी बिल्डिंगच्या टेरेसवर आदित्य बेशुद्धावस्थेत असल्याचे तिला दिसते. ती तातडीने सागरला फोन करून आदित्यबद्दल सांगते. सागर धावत टेरेसवर जातो. आदित्यला सागर रुममध्ये घेऊन येतो. 


मुक्ताच्या मनात प्रश्नांचे काहूर... 


आदित्यला पाहून सगळे चिंतेत पडतात. सावनी मुक्ताला आदित्यला हात लावू नको असे सांगते. त्यावर मुक्ता डॉक्टर आहे, असे सागर सांगतो. आदित्य शुद्धीवर येतो आणि सागरला बिलगून पप्पा मला वाचवा असे म्हणतो. पप्पा मला वाचवा असे सागरला म्हणतोय, नेमकं काय झालं असे मुक्ता विचारते. आदित्य कोणत्या ट्रॉमातून जातोय का असे मुक्ता विचारते. त्यावर सावनी आदित्य घाबरला असेल असे सांगते. आदित्यचे सत्य लपवत असल्याने सागरच्या मनात अपराधीपणाची भावना असते. एकाला जपायला गेलो तर दुसरा दुखावलो जातोय याचा विचार सागर करतो.