Premachi Goshta Episode Updates : 'प्रेमाची गोष्ट'च्या (Premachi Goshta) आजच्या एपिसोडमध्ये आदित्यच्या बर्थ डे पार्टीत मेलोड्रामा दिसणार आहे. आदित्यने बर्थ डे पार्टीला आमंत्रित केल्यानंतर सागर प्रचंड आनंदी आहे. सई आणि मुक्तासोबत सागर आदित्यच्या बर्थ डे पार्टीत जाण्यासाठी सज्ज आहे. सागर सईला आदित्यबद्दल सांगतो. आदित्य आपल्यासोबत का राहत नाही असे सई विचारते. त्यावर सागर अनुत्तरीत होतो. तर, दुसरीकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला मदत करण्यासाठी पावले उचलते.
स्वातीच्या संसारासाठी मुक्ता काय निर्णय घेणार?
स्वाती आणि तिच्या नवऱ्याला मदत करण्याचे आश्वासन मुक्ता देते. स्वातीच्या नवऱ्याकडे एक महिला 15 लाखांची मागणी करते. त्यासाठी पैसे देण्याचे आश्वासन मुक्ता देते. त्यासाठी आपले दागिने विकण्याचा विचार करत असते. त्यासाठी मुक्ता सासू इंद्राकडे तिजोरीच्या चाव्या मागते. त्यावेळी इंद्रा तिला दागिने काढण्यासाठी तिजोरीच्या चाव्यांचा जुडगा देते. त्यावेळी इंद्रा मुक्ताला म्हणते की, हा जुडगा तुझ्या हाती येईल पण हा तुला कमवावा लागेल. जसा मी माझ्या सासूकडून कमवला.
सागरने आदित्यच्या बर्थ डे पार्टीतसोबत येण्याचा आग्रह धरल्याने मुक्ताने स्वातीला आपण उशिरा येणार असल्याचे सांगितले. सागर दुखावेल अशी कोणतीही जोखीम मुक्ता घेत नाही,
आदित्यच्या बर्थ डे पार्टीत काय होणार?
स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' मालिका आता रंजक वळणावर आहे. सावनीकडून आता सागर-मुक्ताच्या संसारात आग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावनीने लहान आदित्यच्या मनात सागरबद्दल तिरस्कार भरला आहे. आदित्यच्या बर्थ डे पार्टीत आलेल्या मुक्ताला सावनी उपदेशाचे धडे देत तुला कोणीही आमंत्रित केले नाही, तरी कशी आलीस असा प्रश्न करते. आमंत्रणाशिवाय मी कुठेच गेली नसती असेही सावनी म्हणते. सावनीच्या या शाब्दिक वारानंतर मुक्ताही पलटवार करते.
आजच्या एपिसोडमध्ये सावनी आणि मुक्तामध्ये काय वाद होणार, मुक्ता सावनीवर शाब्दिक पलटवार कसा करणार, आदित्य आपल्या बर्थ डे पार्टीत सागर-मुक्ता आणि सईला पाहून कसा रिएक्ट होणार, आदींची प्रश्ने आजच्या एपिसोडमध्ये मिळतील.