Gharo Ghari Matichya Chuli :  स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सध्या नव्या मालिकांचा ओघ सुरु आहे. घरोघरी मातीच्या चुली (Gharo Ghari Matichya Chuli) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेचा एक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पण प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांना जितकी प्रमुख भूमिकेची उत्सुकता असते तितकीच प्रेक्षकांना खलनायिकेची देखील उत्सुकता असते. दरम्यान या मालिकेमध्ये छोट्या पडद्यावरील एका खलनायिकेची एन्ट्री झालीये. अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकरही (Pratiksha Mungekar) प्रेक्षकांना या मालिकेत दिसणार आहे. 


प्रतीक्षाने कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यामुळे या मालिकेतही खलनायिकेची भूमिकाच साकारणार का हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ती या मालिकेत रेश्माच्या जावेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालंय. साध्या आणि समजूतदार घरामध्ये जेव्हा बिंधास्त आणि बेधडक सुनेची एन्ट्री होणार तेव्हा नेमकं काय होणार हे मालिका सुरु झाल्यावर हळूहळू उलगडेलच. ही मालिका येत्या 17 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 






अभिनेता आशुतोष पत्कीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन


 'अगंबाई सासूबाई' मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) घराघरात लोकप्रिय झाला. या मालिकेत 'बबड्या' म्हणून भूमिका साकारणारा  आशुतोष पत्की आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आशुतोष पत्की देखील झळकणार आहे. आशुतोष 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सौमित्र ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. 


'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये तगडी स्टारकास्ट


'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत तगडी स्टारकास्ट असणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदेची मुख्य भूमिका आहे. तर, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने व बालकलाकार आरोही सांबरे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असल्याचे मालिकेच्या प्रोमोतून समोर आले. 


ही बातमी वाचा : 


Ashutosh Patki : आशुतोष पत्कीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; 'या' नव्या मालिकेत झळकणार