प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2016 12:26 PM (IST)
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
मुंबईच्या बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये राहुल राजविरोधात भारतीय दंडविधान कलम 306, 504, 506, 323 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करणं, मारहाण, धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी गोरेगावमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 'बालिका वधू' या मालिकेतील 'आनंदी'च्या भूमिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मात्र वैयक्तिक आयुष्यातील चढउतारामुळे तिने आयुष्य संपवलं.
प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक होण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या