Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य देशपांडे सरांसमोर आले असून आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. सत्तुच्या घरी इंद्रा-दीपूचा सुखाचा संसार फुलताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सत्तुच्या घरी फुलणार इंद्रा-दीपूचा सुखाचा संसार
देशपांडे सरांनी इंद्रा आणि दीपूचे प्रेम मान्य करण्यास नकार दिला आहे. इंद्राने दीपूसाठी अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. दीपूला या सगळ्याची जाणीव आहे. त्यामुळेच तिने इंद्रासोबत राहण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तूच्या छोट्याशा घरात दीपूने इंद्रासोबत सुखी संसार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यात देशपांडे सर आणि इंद्राची आई दीपूची मदत करतील का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही
दीपू आणि इंद्राचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचा स्वीकार दीपिकाच्या आईने केला आहे. तसेच इंद्रा-दीपूच्या प्रेमाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा तेव्हा मी दीपिकाच्या बाजूने उभी राहिल असे दीपिकाची आई इंद्राला म्हणते. त्यामुळेच दीपिका म्हणते, कितीही संकट आलं तरी दीपिका इंद्राची साथ सोडणार नाही.
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
संबंधित बातम्या