New Marathi Serial : मनोरंजनाच्या प्रवाहात सातत्याने नवनवे प्रयोग होत असतात. नव्या वर्षातदेखील अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची चांगलीच मेजवानी असणार आहे. 'पिंकीचा विजय असो', 'आई-मायेचं कवच', 'तुझ्या रूपाचं चांदनं' या मालिका नव्या वर्षात प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. 


पिंकीचा विजय असो
पिंकीचा विजय असो ही मालिका 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य भरभरून जगणाऱ्या अतरंगी आणि सतरंगी पिंकीची गोष्ट या मालिकेतून उलगडली जाणार आहे. खाईन तर तुपाशी अशा ठाम विचारांच्या असणाऱ्या पिंकीला फिल्मी दुनियेचं फार आकर्षण आहे. अशी ही स्वप्नाळू पिंकी आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे मालिकेतून पाहायला मिळेल. नवोदित अभिनेत्री शरयू सोनावणे पिंकी ही भूमिका साकारणार असून तिचा हटके अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


आई-मायेचं कवच
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात पालकांना हा प्रश्न नेहेमी पडतो की आपल्या मुलांना आपण किती ओळखतो? याच प्रश्ननाचं उत्तर शोधताना उलगडलं जाणार आई – मुलाचं सुंदर नातं. एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास म्हणजेच ही मालिका. आई-मायेचं कवच ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.





तुझ्या रूपाचं चांदनं
सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मुलीला वाटतं असतं आपण सुंदर दिसावं. सुंदर असणं वा तसं जन्माला येणं हे काही कोणाच्या हातात नसतं ते भाग्यात असतं. पण सौंदर्यचं जर अभिशाप असेल तर ? जर सुंदर दिसणंचं पाप असेल तर ? याच आणि अश्याच अनेक प्रश्नांमधून जातं आहे आपली नक्षत्रा. नक्षत्राची आई तिला लहानपणापासून सांगत आली आहे गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि म्हणूनचं तिची आई नक्षत्राचं सुंदर रूप समाजापासून लपवून ठेवतं आहे. पण काय होईल जेव्हा सुंदर रूपाचा तिरस्कार करणारा दत्ता नक्षत्राला भेटेल ? दत्ताच्या तिरस्कारला नक्षत्रा प्रेमात बदलू शकेल? नक्षत्रा तिचं खरं रूप काही कारणांमुळे लपवत आहे तो या सत्यापासून अनभिज्ञ आहे. तिरस्कार आणि सत्याच्या दुधारी तलवारीवर कसा रंगणार नक्षत्रा आणि दत्तच्या प्रेमकहाणीचा करार ? प्रेमाची परिभाषा बदलवणारी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.