Nakuul Mehta On Troll:  अभिनेता नकुल मेहताला (Nakuul Mehta) छोट्या पडद्यावरील 'बडे अच्छे लगते हैं 2' (Bade Achhe Lagte Hain 2 ) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते हैं-2 या  मालिकेतील नकुल आणि दिशा परमार (Disha Parmar) यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. आता 'बडे अच्छे लगते हैं 3' (Bade Achhe Lagte Hain 3) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.  नकुलने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत  दिशा परमार देखील दिसत आहे. दिशा आणि नकुलच्या या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं 'बडे अच्छे लगते हैं 3'  या मालिकेला ट्रोल केलं आहे. 


नकुल शेअर केला फोटो


‘बड़े अच्छे लगते हैं 3’ या मालिकेमध्ये नकुल मेहता हा राम कपूर ही भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री दिशा परमार ही प्रिया सूद ही भूमिका साकारत आहे. नकुलनं नुकताच दिशासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुमच्या आवडत्या मालिकेच्या नव्या सिझनला दीड आठवडा झाला आहे.' नकुलनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ‘बड़े अच्छे लगते हैं 3’ या मालिकेला ट्रोल केलं आहे.


नेटकऱ्यानं केलं ट्रोल


एका नेटकऱ्यानं नकुलनं शेअर केलेल्या फोटोला कमेंट केली, 'फार मजा येत नाही. मालिकेचा आधीचा सिझन जास्त चांगला होता. प्रिया थकलेली दिसते तर राम सुस्त वाटत आहे. इतर कलाकारांचा इमोशनल कनेक्ट वाटत नाही'. नेटकऱ्याच्या या कमेंट्ला नकुलनं रिप्लाय दिला, 'आम्ही थोडे अजून कष्ट करु' नकुलनं दिलेल्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 






 नकुल मेहता आणि दिशा यांच्या 'बडे अच्छे लगते हैं 3' (Bade Achhe Lagte Hain 3) या मालिकेमध्ये सृष्टी जैन, अक्षित सुखीजा आणि सुप्रिया शुक्ला हे देखील महत्वाची भूमिका साकारतात. ही मालिका दर आठवड्याला रात्री 8 वाजता प्रसारित होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Anupamaa Spoiler: डिंपलच्या आईनं केलं अनुपमाचं कौतुक; 'अनुपमा' मालिका रंजक वळणावर!