Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या धमाकेदार सीझनचा समारोप झाला आहे. रिल्स स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता बनला आहे. सूरजच्या विजयानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणींनी सूरज चव्हाणचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. तर, याउलट सोशल मीडियावर एक दुसरा वर्ग आहे, जो सूरजच्या विजयाला विरोध करत आहे. यातच आता बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण जिंकल्यावर अभिनेत्री मिताली मयेकर नाराज असल्याची चर्चा आहे.


सूरज चव्हाण बिग बॉस विजेता ठरल्यामुळे अभिनेत्री नाराज?


बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5 Winner) पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण (Suraj Chavan) जिंकल्यावर नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर कमेंट्स आणि पोस्ट करत त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. यातच अभिनेत्री मिताली मयेकरच्या एका इंस्टा स्टोरीचा संबंध बिग बॉस मराठी शोसोबत लावला जात आहे. मिताली मयेकरने एक पोस्ट केली ज्यामध्ये लिहिलं होतं की, "रिॲलिटी शो की सिंपथी शो". आता मिताली मयेकरच्या या पोस्टचं कनेक्शन बिग बॉस मराठी शोसोबत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.


व्हायरल होताच डिलीट केली स्टोरी


अभिनेत्री मिताली मयेकरची ही इंस्टा स्टोरी बिग बॉस मराठी सीझन 5 शोबद्दल असल्याचं नेटकऱ्यांना वाटत आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ही इंस्टा स्टोरी व्हायरल होता काही वेळात तिने ती डिलीट केली आहे.




मिताली मयेकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मिताली मयेकरचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहे. मिताली तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते आणि तिचे फोटो तसेच व्हिडीओही शेअर करत असते.


रियालिटी शो की, सिंपथी शो...?



 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Happy Birthday Abhijeet Sawant : पत्र्याच्या शेडमध्ये राहिला, 'इंडियन आयडॉल'नं नशीब चमकलं, बिग बॉस मराठीचा 'जेंटलमन' अभिजीत सावंत कोट्यवधींचा मालक