Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे. अरुंधती परदेशी गेल्यानंतर देशमुख कुटुंबियांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता देशमुखांच्या घरात घुसून चोर इशावर जीवघेणा हल्ला करताना दिसणार आहे. 


देशमुखांच्या घरात चोर शिरल्यानंतर कांचन आजींनी लगेचच आशुतोषला फोन करुन याबद्दल कळवलं आहे. दरम्यान आशुतोष आणि नितीन चोराला पकडायला जातात तेव्हा तो इशाच्या मानेवर सुरी ठेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान इशा मात्र त्या चोराच्या तावडीतून सुटते आणि आशुतोष, नितीन आणि अनिरुद्ध मिळून त्याला पकडतात. 


देशमुखांच्या घरात शिरलेल्या चोराचं नाव अभिमन्यू असं आहे. आशुतोष, अनिरुद्धने अभिमन्यूला पकडल्यानंतर तो त्यांना त्यांची गोष्ट सांगतो. तो म्हणतो,"माझे वडील आजारी आहेत. दोन वर्षांपूर्वी कोरोनाकाळात त्यांची नोकरी गेली. त्यानंतर चांगल्या मार्गाने पैसे कमवायचे मी खूप प्रयत्न केले. पण मला नाही जमलं. एकदा मी देवळात बसलो असताना कांचन आजींबद्दल मला कळलं आणि मी चोरी करण्याचं ठरवलं". 




आशुतोष आता अभिमन्यूला त्याच्याकडे नोकरी देणार आहे. पण दुसरीकडे अनिरुद्ध मात्र अभिमन्यूला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. आता देशमुख कुटुंबीय एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचं ठरवतात. 


'आई कुठे काय करते'चा रंगणार वटपौर्णिमा विशेष भाग


'आई कुठे काय करते' या मालिकेचा लवकरच वटपौर्णिमा विशेष भाग रंगणार आहे. नुकताच यासंदर्भातला एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये संजना कांचन आजीला म्हणत आहे की, मी कोणासाठी पूजा करायची? आता माझं आणि अनिरुद्धमध्ये नवरा-बायकोसारखं काही राहिलेलं नाही, असंही ती आजीला सांगते. आता अनिरुद्ध यावर काय प्रतिक्रिया देणार याची मालिकाप्रेमींना उत्सुकता आहे. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत देशमुखांच्या घरात शिरणार चोर; कांचन आजी कसा करणार संकटाचा सामना?