Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमामधील स्पर्धक   विविध परफॉर्मन्स सादर करतात. त्यांचे हे परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. सध्या ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’  या कार्यक्रमातील एका परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमातील आराध्या आणि  मानसी या दोघी नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीची सदाबहार प्रेम कहाणी प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. 


नांदेडची आराध्या आणि पुण्याची मानसी या फुलवाच्या टीममधील स्पर्धकांनी खास परफॉर्मन्स केला आहे. त्यांच्या या परफॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली आहेत. या परफॉर्मन्सच्या माध्यमातून आराध्या आणि  मानसी यांनी अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगावर (Supriya Pilgaonkar) या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीची सदाबहार प्रेम कहाणी दाखवली आहे. 


पाहा व्हिडीओ: 






आराध्या आणि  मानसी यांचा हा खास परफॉर्मन्स तुम्हाला ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे.  आराध्या आणि  मानसीचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर सचिन पिळगावकर काय रिअॅक्शन देतील? हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.






मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळत आहे. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulwa Khamkar),  वैभव घुगे यांचं (Vaibhav Ghuge) मार्गदर्शन आणि  सुपरजज अंकुश चौधरीचा (Ankush Choudhary) सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.  छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स पहाण्यासाठी न चुकता पाहा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा.


प्रेक्षक ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमामधील डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mi Honar Superstar Jallosh Juniorscha: नृत्यातून सादर होणार कहाणी फुलवा खामकरची; ‘मी होणार सुपरस्टार - जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर खास परफॉर्मन्स