Me Honar Superstar Chhote Ustaad-2: पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर हिरवी शाल पांघरतात तर नद्या दुथडी भरुन वाहतात. अशा वातावरणामध्ये गरमगरम भजी आणि चहाचा आस्वाद घेत पावसाची गाणी ऐकायला अनेकांना आवडतात. आता 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमामध्ये छोटे उत्साद अशीच काही पावसावर आधारित असणारी गाणी गाणार आहेत.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये दिसत आहे की, दापोलीचा 10 वर्षांचा सुशील तांबे आणि नाशिकची 12 वर्षाची सृष्टी अपर्णा पंकज पगारे या दोघांची जुगलबंदी ऐकल्यानंतर परीक्षक स्टँडिंग ओव्हेशन देतात. सुशील आणि सृष्टी यांचा पावसावर आधारित गाण्यांचा परफॉर्मन्स ऐकल्यानंतर आदर्श शिंदे म्हणतो, 'इतकी अवघड बसवलेली जुगलबंदी इतकी सोपी करुन गायलात, त्यासाठी तुम्हाला सलाम' 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2' चा हा प्रोमो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
पाहा प्रोमो:
येत्या शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांना "पाऊसगाणी" हा मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद-2 चा विशेष भाग पाहता येणार आहे. या भागात कार्यक्रमातील छोटे उस्ताद हे पावसावर आधारित गाणी गाणार आहेत.
'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' या कार्यक्रमाचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करतात. हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. या कार्यक्रमाच्या आगमी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.