Masterchef India : 'मास्टरशेफ इंडिया' (Masterchef India) हा लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. 'मास्टरशेफ इंडिया'च्या सातव्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या पर्वातील विजेत्याचं नाव समोर आलं आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान या पर्वातील विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'मास्टरशेफ इंडिया 7'च्या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये नयन ज्योती (Nayan Jyoti) दिसत आहे. या फोटोमध्ये नयनच्या हातात ट्रॉफी असून त्याने मास्टरशेफचा कोट परिधान केलेला दिसत आहे. 'मास्टरशेफ इंडिया 7'चा विजेता नयन झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याला शुभेच्छा देत आहेत. परीक्षकांनी योग्य निर्णय घेतल्याचं 'मास्टरशेफ इंडिया 7' प्रेक्षक म्हणत आहेत.
विकास खन्ना, रणवीर बराड आणि गरिमा अरोडा हे 'मास्टरशेफ इंडिया 7'चे परीक्षक आहेत. जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'मास्टरशेफ इंडिया 7'मध्ये नयनने वेगवेगळे पदार्थ बनवत परीक्षकांना खूश केलं आहे. त्याने बनवलेले पदार्थ प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरले आहेत.
'मास्टरशेफ इंडिया 7'साठी नयनची निवड कशी झाली?
26 वर्षाय नयन ज्योतीला स्वयंपाकाची खूप आवड आहे. नयन शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आहे. वडिलांना शेती व्यवसायात मदत करताना तो जेवण देखील बनवत असे. दररोज वेगवेगळे पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असे. 'मास्टरशेफ इंडिया 7'साठी स्पर्धकांची निवड करताना नयनचा व्हिडीओ विकास खन्ना यांच्या पाहण्यात आला आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी त्याला विचारणा केली.
'मास्टरशेफ इंडिया 7'चा महाअंतिम सोहळा कधी पार पडणार? (Masterchef India finale)
'मास्टरशेफ इंडिया 7'च्या अंतिम टप्प्यात आता आठ स्पर्धक पोहोचले आहेत. यात कमलदीप कौर, अरुणा विजय, प्रियंका कुंडी बिस्वास, सचिन खटवानी, गुपकीरत सिंह, सुवर्णा बागुल, संता सरमाह आणि नयन ज्योतीचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मास्टरशेफ इंडिया 7'चा महाअंतिम सोहळा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडेल. अबू धाबीमध्ये पार पडणाऱ्या या महाअंतिम सोहळ्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या