Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
3. टीआरपी लिस्टमध्ये 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
4. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.
5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे.
7. टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.0 रेटिंग मिळाले आहे.
8. 'स्वाभीमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.7 रेटिंग मिळाले आहे.
9. नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे.
10. 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.7 रेटिंग मिळाले आहे.
मागील चार आठवड्यात 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. या आठवड्यातदेखील ही मालिका पहिल्याच स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 'आई कुठे काय करते' ही मालिका होती. या आठवड्यातदेखील 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आली आहे. मालिकेत रंजक वळणे येत असल्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत नवा ट्विस्ट आल्याने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
संबंधित बातम्या