Marathi Serial Updates Sara Kahi Tichyasathi :  सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सध्या मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये वळण येत आहेत. झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) मालिकेतही आता नाट्यमय वळण येणार आहे.  रघुनाथ खोतांची लेक निशी आणि नीरज यांचा विवाह सोहळा नुकताच पार पाडला. मात्र, आता या कुटुंबावर संकट कोसळणार आहे.  उमाची भाची ओवीवर प्राणघातक हल्ला झाला असून ती गंभीर जखमी झाली आहे. आता या हल्ल्यामागे कोण आहे, खरंच हा हल्ला गुन्हेगारांनी केला की त्यांना सुपारी दिली?  अशा अनेक प्रश्नांची उकल होणे बाकी आहे. 


सारं काही तिच्यासाठी मालिकेत निशी आणि नीरजचे प्रेम प्रकरण अनेक अडथळ्यांना पार करून विवाह बंधनात अडकले आहेत. तर, दुसरीकडे आता श्रीनिवास आणि ओवी यांच्या प्रेमाची परीक्षा सुरू होणार आहे. मंजूची भाची चारूची देखील श्रीनिवाससोबत लग्न करण्याची इच्छा आहे, त्यासाठी ती मंजूची मदत घेत आहे. चारूने श्रीनूची आई लालीवर प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे. 


निशीचा गृहप्रवेशापासून अडथळे


लग्नानंतर आता निशीने नीरजच्या घरात गृहप्रवेश केला आहे. मात्र, सुरुवातीपासूनच निशीच्या गृहप्रवेशानंतर अपशकुन वाटाव्या अशा घटना सुरू आहेत. त्यामुळे या घटना योगायोग आहे की मेघनाचा त्यामागे हात आहे, याचा उलगडा अद्याप झाला नाही. 


ओवीवर प्राणघातक हल्ला


निशीची पाठराखण म्हणून ओवीदेखील तिच्यासोबत सासरी गेली आहे.ओवी आणि निशीच्या बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवतात. हा गेट टुगेदर आटोपून निशी आणि ओवी परत येत असताना
सुनसान रस्त्यावर दोन गुंड येऊन त्यांच्या कडचे पैसे आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, निशी आणि ओवी त्यांचा प्रतिकार करतात. चोरांकडून निशीच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न करतात. पण, निशी त्याला विरोध करते. ओवीदेखील प्रतिकार करत निशीला वाचवते.पण त्या झटापटीत ओवी गंभीर जखमी होते. 


ही  घटना घडत असताना दुसरीकडे खोतांच्या घरी लाली श्रीनिवासच्या लग्नाबाबत घरी चर्चा छेडते आणि चारूचे नाव पुढे करते. त्यावर उमा आणि रघुनाथ हे श्रीनिवासला लग्नाबाबत विचारले का, त्याची इच्छा आहे का, असे विचारतात. श्रीनिवास काही बोलण्याच्या आधी निशीचा रघुनाथला फोन येतो. निशी खूप घाबरलेली असते. निशीच्या फोनने  रघुनाथ आणि घरातले लोक चिंतेत येतात.






 


निशी आणि ओवीवर हल्ला करणारे खरंच चोर होते का, त्यांच्यावर हल्ला करणारे कोणी पाठवले? हल्लेखोरांच्या निशाण्यावर ओवी होती की निशी? मेघना पुन्हा कटकारस्थान करतेय की चारूलाच ओवीचा काटा काढायचा आहे? अशा अनेक प्रश्नांची उकल आता आगामी काही एपिसोडमध्ये होणार आहे.