Marathi Serial Punha Kartavya Aahe :  छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या मालिकांच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सीरियलच्या स्टोरी प्लॉटमध्ये रंजकता आणण्यासाठी काही प्रयोगही केले जातात. मात्र, काही वेळेस प्रेक्षकांना हे प्रयोग आवडतात. तर, काही वेळेस हे बदल रुचत नाहीत. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर सुरू असलेली 'पुन्हा कर्तव्य आहे' ( Punha Kartavya Aahe) या मालिकेवर प्रेक्षकांनी टीका केली आहे.


'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारीत आहे. आकाश आणि वसुंधरा यांचा विवाह पार पडला असून वसुंधरा सासरी आली आहे. मात्र, तिची सासू जयश्री तिचा छळ करत असून यात जयश्रीची नणंदही आहे. नणंद जयश्रीचे कान भरते. तर,आकाशच्या लहान मुलींचाही वापर वसुंधरा आणि तिचा मुलगा बनीविरोधात केला जात आहे. आता, मालिकेत आकाश-वसुंधराने बनीचे अॅडमिशन एका मोठ्या शाळेत केले आहे. बनीच्या अॅडमिशनसाठी वसुंधराने पैसे जमवले आहेत. मात्र, आकाश वडील म्हणून बनीची फी भरतो. त्यावर जयश्री वसुंधराला चांगलीच सुनावते. मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 






ही घाण आहे मालिका, प्रचंड राग येतोय...


'प्रेक्षकांनी पुन्हा कर्तव्य आहे'च्या प्रोमोवर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले की, आग लावालावीची सीरियल आहे ही. तर आणखी एका युजरने ही किती घाण आहे मालिका अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने या मालिकेबद्दल प्रचंड चीड येत असल्याचे सांगितले. सासू, तिची नणंद आणि चिनू-मनू यांच्याबद्दलही राग येत असल्याचे युजरने म्हटले.








एका युजरने मालिकेत आता सकारात्मक ट्रॅक सुरू करा अशी मागणी केली आहे. एका युजरने म्हटले की अशाने वसू स्वतंत्र होईल, ती प्रत्येक गोष्टीसाठी आकाशवर अवलंबून राहणार नाही  असे म्हटले.