Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्मिते सतत मालिकेत ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानची (Tejashree pradhan) 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर आहे. 


1. टीआरपीच्या शर्यतीत 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'ठरलं तर मग' (Tharala tar mag) ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. 


3. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.


4. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.


5. टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे. 


6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सहाव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.


7. 'आई कुठे काय करते' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.  


8. टीआरपीच्या शर्यतीत 'कुन्या गावाची गं तू रानी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.3 रेटिंग मिळाले आहे.  


9. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे. 


10. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. 


पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तेजश्री प्रधानचं राज्य


'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेच्या माध्यमातून तेजश्री प्रधान घरघरांत पोहोचली आहे. तिची ही मालिका चांगलीच गाजली. आता पुन्हा एकदा 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. तर दुसऱ्या आठवड्यात या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.


संबंधित बातम्या


Tejashree Pradhan : सायली-अरुंधती पडली मागे; टीआरपीच्या शर्यतीत तेजश्री प्रधानने मारली बाजी