Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात नवीन ट्विस्ट येत आहेत. 'झी मराठी'वरील (Zee Marathi) 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या कथानकात मोठे बदल होणार आहे. नेत्राच्या मदतीला देवी आई धावून येणार आहे. देवी आईने दिलेल्या शस्त्रातून विरोचकाचा मृत्यू होणार आहे. देवी आईच्या भूमिकेत अभिनेत्री अदिती सारंगधर दिसणार आहे. 


'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. नेत्राला प्रसुतीकळा सुरू झाल्या आहेत. अद्वैत तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आपल्या कारमधून नेत असतो. मात्र, त्याच दरम्यान त्याची कार बंद पडते. अखेर चारचाकी हातगाडीवरून तो नेत्राला रुग्णालयात नेण्यासाठी धडपडत असतो. त्याला नेत्राची स्थिती पाहवत नाही. चिंतातूर झालेला अद्वैत देवी आईला हाक मारतो. त्याच वेळी एक महिला त्यांच्या मदतीला येते. 


ही महिला दोघांना घेऊन मंदिरात जाते. त्या ठिकाणी नेत्रा जुळ्या मुलांना जन्म देते. त्यानंतर अखेर ती महिला आपलं खरं रुप धारण करते. ही महिला साक्षात देवी आई असते. देवी आई नेत्राला विरोचकाचा नाश करण्यासाठी अस्त्र देते.   विरोचकाचा वध कर आणि त्याच्या रक्ताने मला अभिषेक घाल, असे नेत्राला देवी आई सांगते.  नेत्राला झालेल्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाच्या शरीरात विरोचकाचा अंश आहे का? याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 






'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत देवी आईच्या भूमिकेत अदिती सारंगधर दिसणार आहे.  अदिती सारंगधर या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.  आदितीने या आधी 'लक्ष्य' मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.


देवी आईच्या आशीर्वादानंतर आता नेत्रा विरोचक रुपालीचा वध करणार का,  मालिकेत आणखी कोणते नवीन ट्वीस्ट येणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: