Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात गेल्या काही दिवसांत वेगवेगळे प्रयोग होत आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते, लेखक, दिग्दर्शक मालिकेत सतत नव-नविन ट्विस्ट आणत असतात. याचाच परिणाम मालिकांच्या टीआरपी रेटिंगवर होत असतो. टीआरपी रिपोर्टमध्ये दर आढवड्याला चढ-उतार होत असतो. नुकत्याच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. जाणून घ्या या आठवड्याच्या टॉप 10 मालिका...


1. 'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. 


2. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 


3. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेला 6.2 रेटिंग मिळाले आहे.


4. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे. 


5. एकेकाळी टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेली 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात सध्या कमी पडली आहे. या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे. 


6. 'आता होऊ दे धिंगाणा' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या कार्यक्रमाला 5.5 रेटिंग मिळाले आहे. 


7. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.2 रेटिंग मिळाले आहे. 


8. टीआरपीच्या शर्यतीत 'स्वाभिमान' ही मालिका आठव्या स्थानावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे. 


9. 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.3 रेटिंग मिळाले आहे. 


10. टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर 'अबोली' मालिका आहे. या मालिकेला 4.1 रेटिंग मिळाले आहे. 


'बिग बॉस मराठी' पडलं मागे


टीआरपीच्या शर्यतीत 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व मागे पडलं आहे. या कार्यक्रमाला फक्त 2.3 रेटिंग मिळाले आहे. बिग बॉस प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा यासाठी निर्माते वेगवेगळे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही हा कार्यक्रम आपली जादू दाखवण्यात कमी पडतो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक प्रेक्षकांना आवडत नसल्याने त्याचा परिणाम थेट कार्यक्रमाच्या टीआरपीवर होत आहे. 


संबंधित बातम्या


Akshaya Hardeek Wedding :'माझंही नाव घेते अक्षया हार्दिक जोशी'; पाठकबाईंनी घेतलेला भला मोठा उखाणा ऐकलात का?