Atisha Naik: मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अतिशानं सुख म्हणजे नक्की काय असतं, सुंदरा मनामध्ये भरली यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. अतिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. एका मुलाखतीमध्ये अतिशानं तिला आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले.
मज्जा या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अतिशा नाईकनं वेगवेगळे किस्से सांगितले. या मुलाखतीमध्ये अतिशानं तिच्या वडिलांबाबत सांगितलं. ती म्हणाली की, 'मी माझ्या वडिलांसोबत कोणत्याही विषयांवर बोलू शकत होते. मला जेव्हा पहिल्यांदा मासिक पाळी आली होती तेव्हा मी सगळ्यात आधी माझ्या वडिलांना सांगितलं होतं.'
मानधनाबाबत अतिशानं सांगितलं,'मी गुड बाय डॉक्टर नावाच्या नाटकात काम करत होते. त्या नाटकाचे पैसे माझ्या आईकडे असायचे. एका प्रयोगाला माझे वडील माझ्यासोबत आले होते. तेव्हा नाटकाचं मिळालेलं मानधन आम्ही एका कॅन्सर पेशंटला दिले होते.'
वेक अप सिड या हिंदी चित्रपटामध्ये देखील अतिशानं काम केलं. या चित्रपटाबाबत अतिशानं सांगितलं, 'मला ऑडिशनसाठी फोन आला होता. धर्मा प्रोडक्शन ऐकून मी गेले होते. जेव्हा शूटिंग करताना अयान मुखर्जी मला सिन दाखवत होता. तेव्हा रणबीर कपूर खाली बसला होता. तो कसलाच टॅन्ट्रम दाखवत नव्हता.'
सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका का सोडली? असा प्रश्न देखील अतिशाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं तिनं उत्तर दिलं, 'माझी आई 86 वर्षाची होती. ती फेब्रुवारी महिन्यात गेली. जेव्हा मी त्या मालिकेत काम करत होते त्यावेळी ती खूप अजारी असायची. मी शूटिंग करत असताना नाशिकमध्ये राहात होते. मी आईच्या हाकेच्या अंतरावर असावं, असं मला वाटत होतं. त्यामुळे मी ती मालिका सोडली.'
अतिशानं गंगूबाई काठियावाडी, लफंगे परिंदे यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं तसेच तिनं सॉरी रॉन्ग नंबर, जाऊबाई जोरात,वाडा चिरेबंदी या नाटकांमध्ये देखील काम केले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: