Marathi Serial Updates Appi Amchi Collector Marathi Serial : सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये विविध प्रयोग सुरू आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत राहण्यासाठी विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्ये नवा ट्विस्ट, कलाकारांची नवी एन्ट्री आणली जात आहे. 'झी मराठी'वरील (Zee Marathi) मालिकेत आता नवा बालकलाकार झळकणार आहे.'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यातून घराघरात पोहचलेला साईराज केंद्रे हा झी मराठीवरील मालिकेत दिसणार आहे. त्याच्या प्रोमोमध्ये सिंघम स्टाइल एन्ट्री दाखवली आहे.
झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) या मालिकेत आता अनेक बदल झाले आहेत. या मालिकेने आता थेट सात वर्षांचा लीप घेतला आहे. आता मालिकेत सात वर्षानंतरचे कथानक दाखवण्यात आले असून आप्पीची बदली उत्तराखंड मध्ये झाली आहे. त्याआधी कलेक्टर म्हणून उत्तराखंडला बदली झाल्याचं अप्पी अर्जुनला सांगते तेव्हा त्याच्यासमोर दोन पर्याय असतात. त्याचं काम सोडून, इथलं सगळं आयुष्य सोडून अप्पीसोबत उत्तराखंडला जाणं किंवा इकडंच राहणं. अप्पीनं आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन इकडेच राहायचा निर्णय घेतो. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने ती उत्तराखंडला निघून जाते.
अर्जुन अप्पीकडून वचन घेतो, त्या वचनानुसार अमोलला त्याच्या बाबाबद्दल काही कळलं नाही पाहिजे. अप्पीदेखील अमोलला काहीच सांगत नाही. पण, अप्पीने वचन निभावत असे. पण, देवाच्या दारात आता अमोल आणि त्याचा बाबा अर्जुन यांची भेट होणार आहे.
देवाच्या साक्षीने सात वर्षापासून ताटातूट झालेले वडील आणि मुलाला नियती जवळ आणणार का? अर्जुनला कळणार का तो चिमुकला त्याचाच मुलगा आहे, अप्पी आणि अर्जुन यांची भेट होणार का, अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय ? ते दोघे पुन्हा एकमेकांजवळ शकतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच समजणार आहे.