Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'  (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आजोबांची तब्येत खालावल्याने नेहा सध्या पॅलेसवर राहायला आली असून ती आजोबांची काळजी घेत आहे. त्यामुळे नेहाचे परीकडे दुर्लक्ष होत आहे. नेहाचे परीकडे दुर्लक्ष होत असल्याने यश परीची आईसारखी काळजी घेणार आहे. 


'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या आगामी भागात यश नेहाला भेटायला परीसाठी खास भेटवस्तू घेऊन जाणार आहे. तसेच तिच्यासोबत खेळणार आहे. तिला खायला देऊन झोपवताना दिसणार आहे. परीचा शांत झोपलेला फोटो तो नेहाला पाठवणार आहे. नेहाच्या गैरहजेरीत यश परीची आईसारखी काळजी घेत असलेली पाहून नेहाची चिंता मिटणार आहे.





नेहामुळे यशच्या पॅलेसचे रुपांतर घरात होणार आहे. मालिकेत सध्या नेहा आणि यशला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Maha Episodes : राया कृष्णाला पुन्हा विधातेंच्या घरात आणणार, तर सौरभच्या वाड्यात रामनवमी साजरी होणार!


‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर आणि श्वेता शिंदे पुन्हा साकारणार गाजलेली भूमिका


Anand Math : बंकिमचंद्र चटर्जींच्या ‘आनंदमठ’चा रिमेक येणार, नव्या वर्षांत चित्रपट प्रदर्शित होणार!