Maharashtracha Favourite Kon? Suvarnadashak Sohla : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांसाठी महत्तवाचा असणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा पुरस्कार सोहळा आज रंगणार आहे. मागील दहा वर्षांमधील कलाकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सुवर्णदशक सोहळ्यात सूत्रसंचालनाची जबाबदारी महेश मांजरेकरांनी सांभाळली आहे. 


शाब्दिक फटकेबाजी करण्याची महेश मांजरेकरांची कला 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळयामध्ये पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. पहिला तडाखा अर्थातच स्वप्नील-अमेय जोडीलाच बसणार आहे. 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळयाचं सूत्रसंचालन करताना एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दोघांची 'तू तू मैं मैं' सुरू असताना प्रेक्षकांमधून मांजरेकरांचा आवाज येणार आहे. दोघंही काही क्षणासाठी अवाक झालेले दिसणार आहेत. पण महेश मांजरेकरांच्या विंनतीला मान देत ते जे बोलतील ते दोघेही मान्य करताना दिसणार आहेत. त्यानंतर काही वेळ मांजरेकर स्वत: मुख्य सूत्रसंचालनाचा लगाम स्वत:च्या हाती घेणार आहेत.





'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या


Year Ender 2021 : 'Gullak 2' पासून 'The Family Man 2' पर्यंत 'या' वेबसीरिजने गाजवले 2021 वर्ष


Bigg Boss Marathi 3 : येत्या रविवारी रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले


Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' झळकणार रुपेरी पडद्यावर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha