मुंबई : सोनी टीव्हीवरील गाण्याचा रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या नवव्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा रविवारी झाली. या पर्वातील अंतिम सामन्यात एल.व्ही. रेवंथने पीव्हीएनएस रोहित आणि खुदा बख्श यांना मागे टाकून इंडियन आयडॉल होण्याचा मान पटकावला.


या कार्यक्रमावेळी शोचे जज सोनू निगम, अनू मलिक आणि फरहान अख्तर यांच्यासोबत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही उपस्थीत होता. स्पर्धकांनी सादर केलेल्या गाण्यांना त्याने मुक्तकंठाने दाद दिली. तसेच सुप्रसिद्ध विनोदवीर सुनील ग्रोव्हरनेही आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना हसवले. नवव्या पर्वातील विजेत्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रेवंथला सचिन तेंडुलकरच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आलं.



इंडियन आयडॉल झाल्यानंतर रेवंथने आपल्या बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच इंडियन आयडॉलचा बहुमान मिळवल्यानंतर आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.