Lek Majhi Durga : नवीन वर्षात छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्या आहेत. तर लवकरच काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच कलर्स मराठी 'लेक माझी दुर्गा' (Lek Majhi Durga) ही नवीकोरी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर भाष्य करणारी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 


लेक माझी दुर्गा या नव्या मालिकेत हेमांगी कवी आणि सुशील इनामदार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आईच्या प्रेमापेक्षा बापाच्या डोळ्यातील आग तिला सलतेय, दुर्गा स्वत:च्या अस्तित्त्वासाठी का बरं संघर्ष करतेय? असे म्हणत मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला आहे. मालिकेत  चिमुकली दुर्गा जन्मजात विकृतीमुळे आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसणार आहे.






'या' मालिकेचा आहे रिमेक
लेक माझी दुर्गा ही नवी मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते. कलर्स या हिंदी वाहिनीवर शक्ती अस्तित्व एक एहसास की ही मालिका प्रसारित केली जात होती. गेल्या काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. 'लेक माझी दुर्गा' ही मालिका 'शक्ती अस्तित्व एक एहसास की' या मालिकेचा रिमेक आहे. 


संबंधित बातम्या


ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर येतोय कपिल शर्माचा नवा शो, या आठवड्यात आणखी काय प्रदर्शित होतंय? घ्या जाणून


Tara Sutaria-Aadar Jain Love Story : तारा सुतारिया आणि आदर जैनची लव्हस्टोरी फुल्ल टू फिल्मी!


ROHILEEचा लग्नसोहळा थाटामाटात पडला पार, पुण्याच्या ढेपेवाढ्यात बांधली लग्नगाठ!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha