Lakshmi Niwas Marathi Serial Track: 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas) मालिकेत जान्हवीच्या लग्नानंतर पहिल्यांदा जान्हवी-जयंतला सत्यनारायण पूजेसाठी घरी आमंत्रित केले जात. तर इकडे सिद्धूला कळत नाही की संपूर्ण कुटुंब त्याच्यासाठी मुलगी शोधत आहेत. जान्हवी जयंतला बाहेर जेवायला जाण्याचा आग्रह धरते. जयंत आणि जान्हवी जेवणासाठी बाहेर गेले असताना, तिथेच विश्वा दारू पित बसलेला दिसतो.
भावना सिद्धूला लग्नासाठी मुलगी पाहायला जाण्यापासून टाळण्यासाठी एक युक्ती सुचवते. ज्यामुळे त्याच्या लग्नाच्या पाहण्याचा कार्यक्रम रद्द होतो. जयंत आणि जान्हवीच्या घरी एक स्त्री, मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी येते, त्यामुळे जयंत अस्वस्थ होतो. जान्हवी हातात कॉफीचा कप असताना, तो चुकून खाली पडतो, आणि यामुळे जयंत संतापतो. जयंत आणि जान्हवी घरी पोहोचतात. जयंतला एका गोष्टीची भीती आहे की जान्हवी जेव्हा घरी एकटी असते तेव्हा तिला घरात बंद करून ठेवल जातं हे जर कुटुंबाला कळल तर काय होईल. जान्हवी आणि तिच्या आई-वडिलांमधील घट्ट नातेसंबंध पाहून जयंत अस्वस्थ आहे. वीणा चंपाला सांगते की वेंकी अनाथ आहे. संतोष वेंकीला ओरडतो ज्यामुळे चंपाला त्याच्यासाठी वाईट वाटते. सिद्धू जखमी असल्याचा नाटक करून दळवींकडे येतो. तो भावनाला सांगतो की गाडेपाटलांनी त्याला मारहाण केली आणि जर भावनाने त्याला मदत केली नाही तर तो ही गोष्ट सर्वांना सांगेल. हे ऐकून भावना त्याची मलमपट्टी करणार आहे. श्रीनिवास जयंतला सांगतो की वेंकी अनाथाश्रमातून दत्तक घेतल आहे आणि जयंत स्वतःही त्याच अनाथाश्रमातून आला आहे आणि ही गोष्ट जयंतला हादरवून सोडते, कारण लहानपणी जयंत आणि वेन्की जिवलग मित्र होते.
दरम्यान, नक्की काय आहे जयंतच खरं सत्य ? हे सत्य सर्वांसमोर येईल? सिद्धूचे, भावना सोबत मैत्री वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.