Komal Kumbhar : अभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अबोली (Aboli) मालिकेत कोमलची एण्ट्री होणार असून मनवा हे पात्र ती साकारणार आहे. मनवाला नाईलाजाने देहविक्रेय व्यवसायात उतरावं लागलं. याविषयी तिच्या मनात सल आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये असं तिला वाटतं. अबोलीच्या पुढाकारामुळे मनवाचा शिंदे कुटुंबात प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे. मनवाचं शिंदे कुटुंबासोबत नेमकं काय नातं आहे हे देखिल मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.


"कोमल म्हणाली, अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं"


अबोली मालिकेतल्या मनवा पात्राविषयी सांगताना कोमल कुंभार म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या प्रकारची भूमिका साकारते आहे. लूकही खूप वेगळा आहे. अंजीप्रमाणेच मनवाही ठसकेबाज आहे. अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचाही आनंद आहेच. सहकुटुंब सहपरिवार मधल्या अंजीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम मनवा या भूमिकेलाही मिळेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका, अबोली!'






'अबोली' या मालिकेत अभिनेत्री गौरी कुलकर्णीने अबोलीची भूमिका साकारली आहे. तसेच या मालिकेत  सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. आता या मालिकेत कोमलची एन्ट्री होणार असल्यानं प्रेक्षक या मालिकेच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत.


कोमल कुंभारबद्दल जाणून घ्या


अबोली या मालिकेआधी कोमलनं  "सहकुटुंब सहपरिवार" या मालिकेतील अंजली (अंजी) ही भूमिका साकारली आहे. कोमल ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देणार आहे. कोमल ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिला सोशल मीडियावर  143K  फॉलोवर्स आहेत. कोमल तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी कोमलनं होऊ दे धिंगाणा-2 या शोमध्ये देखील हजेरी लावली होती.
 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळकची धमाकेदार एन्ट्री; 'या' भूमिकेत दिसणार अभिनेता