Kiran Mane: अभिनेते  किरण माने (Kiran Mane) हे सध्या  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. किरण माने  हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच किरण माने यांनी एक मीम सोशल मीडियावर शेअर केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या या मीमनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


किरण माने यांची पोस्ट


किरण माने (Kiran Mane) यांनी शेअर केलेल्या मीममध्ये लिहिलं आहे, 'पुन्हा सांगतो लक्षात घे, भारतात मुस्लिम आहे म्हणून तुम्ही हिंदू आहात. नंतर तुम्ही खालच्या किंवा वारच्या जातींचे राहणार' किरण माने यांनी या मीमला कॅप्शन दिलं, ...हे मीम लै खोल हाय. एका फटक्यात भानावर आननारं हाय. बघा. विचार करा. लब्यू जितेंद्र रायकर' किरण माने यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



किरण माने हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करतात. त्यांना फेसबुकवर 63 हजार फॉलोवर्स आहेत.  इन्स्टाग्रामवर त्यांना 16.4K फॉलोवर्स आहेत. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात.


किरण माने यांच्या मालिका


किरण माने यांनी माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो या मालिकांमध्ये काम केलं. किरण माने हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. बिग बॉस मराठी या शोमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. आता त्यांची “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची”  ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी एक पोस्ट शेअर करुन “सिंधुताई माझी माई  या मालिकेतील त्यांच्या भूमिकेची माहिती दिली.


या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलं होतं, 'आपल्या एखाद्या भुमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय... सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा 'रियल लाईफ हिरो'...सिंधूताईंच्या आयुष्यातला 'बाप'माणूस अभिमान साठे !'






इतर महत्वाच्या बातम्या: 


Kiran Mane: 'फुले, शाहू, आंबेडकरांच्या आयुष्यातल्या संघर्षाची उदाहरणं द्यायचो. पण...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत