Khupte Tithe Gupte : प्रेक्षकांना गेल्या काही दिवसांपासून नवीन दर्जेदार कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित कार्यक्रमाच्या पहिल्या भागात नक्की कोण हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या नव्या पर्वाच्या पहिल्या भागात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाराष्ट्राचं मोठं व्यक्तिमत्त्व असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हजेरी लावणार आहेत. नुकतचं या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
झी मराठीने नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना दिसत आहेत की,"खुपते तिथे गुप्ते इथे प्रश्नांना धार आहे, पण मी पण तयार आहे". झी मराठीने "प्रश्नांना कितीही असो धार माननीय मुख्यमंत्री आहेत तयार", असं म्हणत हा प्रोमो शेअर केला आहे.
'खुप्ते तिथे गुप्ते'चा पहिला भाग खूपच खास असणार आहे. एकनाथ शिंदेंसह महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे महाराष्ट्राचे आवडते राजकीय नेते मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेदेखील 'खुप्ते तिथे गुप्ते'च्या पहिल्या भागात सहभागी होणार आहेत. गुप्तेंच्या खोचक आणि धारदार प्रश्नांना राज ठाकरेदेखील तेवढीच धारदार उत्तरे देताना दिसणार आहेत.
'खुप्ते तिथे गुप्ते' 'या' दिवशी होणार सुरू
'खुप्ते तिथे गुप्ते'च्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सुरुवार दमदार होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये कोण कोण हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं नवं पर्व 4 जूनपासून सुरू होणार आहे. 4 जून 2023 रोजी रविवारी 9 वाजता पहिल्या भागाचं प्रसारण होणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे.
संबंधित बातम्या