Khatron Ke Khiladi 14 Winner Name Leak : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा रियलिटी शो 'खतरों के खिलाडी 14' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज खतरों के खिलाडी 14 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे या शोचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शोच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये शालीन भनोट, गश्मीर महाजनी, अभिषेक कुमार, करणवीर मेहरा और कृष्णा श्रॉफ हे स्पर्धक होते. आता ग्रँड फिनालेच्या आधीचं शोच्या विजेत्याचं नाव लिक झालं आहे. 'खतरों के खिलाड़ी 14' ग्रँड फिनाले आज रात्री 9 वाजता टेलीकास्ट होणार आहे. त्याआधीच शोच्या विनरची चर्चा आहे. 


हा खेळाडू 'खतरों के खिलाडी 14' चा विजेता?


वास्तविक, आज शोमध्ये हे सांगितले जाईल की खतरों के खिलाडी 14 शोचा खिताब कोणी जिंकला आहे. विजेत्यापूर्वी, आलिया भट्ट शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती आणि तिने स्पर्धकांसोबत खूप मजा केली होती. याचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या शोशी संबंधित एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक, शोच्या विजेत्याचे नाव सोशल मीडियावर लीक झाले.


ग्रँड फिनाले आधीच विजेत्याचं नाव लीक


रिॲलिटी शोशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या ट्विटर पेजने ही माहिती सोशल मीडियावर 'खतरों के खिलाडी 14'बद्दलची माहिती शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शोच्या विजेत्याचं नावही समोर आलं आहे. शालीन भानोत, गश्मीर महाजनी, अभिषेक कुमार, करणवीर मेहरा आणि कृष्णा श्रॉफ टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत. आता मिळालेल्या बातमीनुसार, करणवीर मेहराने चार खेळाडूंना मागे टाकत  'खतरों के खिलाडी 14' शोची ट्रॉफी जिंकली आहे. 'द खबरी'च्या ताज्या रिपोर्टनुसार, करणवीर मेहराने 'खतरों के खिलाडी 14' जिंकला आहे.






मीडिया रिपोर्टनुसार,  करणवीर मेहरा 'खतरों के खिलाडी 14' शोचा विजेता ठरला आहे. गश्मीर महाजनीकडून शो जिंकण्याची संधी थोडक्यात हुकल्याचंही बोललं जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यामध्ये किती तथ्य आहे आणि किती नाही हे आज ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याच्या नावाची घोषणा झाल्यावर कळेल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


तारक मेहताच्या निर्मात्यांनी छळ केल्याचा ‘सोनू’चा आरोप; अभिनेत्री म्हणाली, "मला..."