Khatron Ke Khiladi 11 winner Arjun Bijlani: खतरों के खिलाडी 11 (Khatron Ke Khiladi 11) च्या ज्या क्षणाची प्रेक्षक मनापासून वाट पाहत होते. तो क्षण आता आला आहे. शेवटी, खतरों के खिलाडी कोण आहे हे जाहीर करण्यात आले आहे. निकालानंतर, चाहते देखील थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, निकाल त्यांच्या अपेक्षेच्या अगदी विरुद्ध आला आहे. अर्जुन बिजलानीने (Arjun Bijlani) खतरों के खिलाडी 11 ट्रॉफी जिंकली आहे आणि दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) विजयापासून फक्त एक पाऊल मागे आहे. अर्जुन बिजलानीने दिव्यांकाचा पराभव करून विजयी झाला आहे.
अर्जुन बिजलानी विजेता ठरला
खतरों के खिलाडी 11 मध्ये, अर्जुन बिजलानीने नेहमीच प्रत्येक टास्क फक्त पूर्ण केला नाही तर प्रत्येकवेळी सर्वोत्तम कामगिरी करून स्वतःला सिद्ध केलंय. शोचा होस्ट रोहित शेट्टीनेही अर्जुन बिजलानीचे कौतुक केले होते. तो म्हणाला होता की अर्जुन नेहमी शांतपणे आपले काम पूर्ण करतो, तो घाबरत नाही किंवा जिंकल्यानंतर दिखावा करत नाही. तो जातो आणि टास्क पूर्ण करुन त्याच्या जागी येतो. प्रत्येक वेळी त्याने उत्तम कामगिरी केली आहे.
दिव्यांका होती प्रबळ दावेदार
निकाल काहीही असो, पण चाहत्यांना पूर्ण आशा होती की यावेळी दिव्यांका त्रिपाठी सामना जिंकेल आणि ती खतरों के खिलाडी 11 ची विजेती होईल. पहिल्याच टास्कपासून, दिव्यांकाने सिद्ध केले होते की ती सर्वात योग्य दावेदार आहे. प्रत्येकाशी स्पर्धा करणार आहे आणि जिंकण्यासाठी आली आहे. सर्व टास्कमध्ये दिव्यांकाचा उर्जा पाहून प्रत्येकाने आपली बोटं तोंडात घातली होती. दिव्यांकालाही मगर राणीचा दर्जा देण्यात आला. पण अर्जुनचे नशीब जोरावर होतं आणि त्याने विजय मिळवला. अर्जुन बिजलानीने शेवटच्या टास्कमध्ये उत्तम कामगिरी केली आणि त्याची विजेता म्हणून निवड झाली. यात निक्की तांबोळी दुसऱ्या क्रमांकावर होती. तर अनुष्का सेन रोहित शेट्टीच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होती. खतरों के खिलाडी 11 मधील सर्वात लहान स्पर्धक अनुष्काने प्रत्येक काम खूप चांगले केले.
'रनमशीन' विराटच्या नावे नव्या विक्रमाची नोंद
टीम इंडिया आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार 'रनमशीन' विराट कोहलीने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. टी- 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावाचा टप्पा पार करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2021 च्या दुबई येथे सुरु असलेल्या सामन्यात विराटने ही कामगिरी केली आहे. विराट कोहली टी - 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करणारा पाचवा खेळाडू आहे.