aun Banega Crorepati 15 Rahul Nema: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15) या कार्यक्रमामध्ये राहुल नेमा यांनी हजेरी लावली. राहुल नेमा (Rahul Nema) हे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर बसले होते. त्यांनी 50 लाख रुपये जिंकले. पण एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत.
राहुल नेमा यांना 360 फ्रॅक्चर झाले आहेत. राहुल यांची गोष्ट ऐकून बिग बीही खूप भावूक झाले. राहुल यांचे धाडस पाहून अमिताभ बच्चन यांनी त्याचे कौतुक केले. केबीसीच्या एपिसोडमध्ये राहुल नेमा यांना एक कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर राहुल देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांची 'करोडपती' होण्याची संधी हुकली.
बिग बींनीराहुल नेमा यांना प्रश्न विचारला, 'कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे?' या प्रश्नासाठी अमिताभ बच्चन यांनी राहुल यांना चार पर्याय देखील दिले. या प्रश्नाचे पर्याय होते - बिजू पटनायक, ज्योती बसू, वीरप्पा मोईली, ईएमएस नंबूदिरीपाद
काय आहे उत्तर?
एक कोटींसाठी बिग बी यांनी राहुल यांना विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर वीरप्पा मोईली हे होते. या प्रश्नाचे उत्तर राहुल यांना देता आलं नाही. त्यामुळे त्यांना खेळ सोडला लागला.
अमिताभ बच्चन 2000 मध्ये पहिल्या सीझनपासून कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. फक्त तिसरा सीझन अभिनेता शाहरुख खानने होस्ट केला होता. विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. केबीसीची सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बिग बींचा प्रोजेक्ट-के हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन