Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची अर्थात 'कौन बनेगा करोडपती 15'ची (Kaun Banega Crorepati 15) चाहत्यांना उत्सुकता आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'कौन बनेगा करोडपती 15' कधी सुरू होणार?
'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रोमो शेअर करत निर्मात्यांनी प्रीमियरचीदेखील घोषणा केली आहे. 'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रीमियर 14 ऑगस्टला रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती'चे 14 सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून ते आता नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रोमो आऊट (Kaun Banega Crorepati 15 Promo Out)
'कौन बनेगा करोडपती 15'च्या प्रोमोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. अमिताभ यांच्या एन्ट्रीला उपस्थित सर्व प्रेक्षक उभं राहून त्यांचं स्वागत करताना दिसत आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वात नाविन्यता असेल, असंही ते म्हणाले आहेत.
सोनी टीव्हीने 'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रोमो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. "ज्ञानदार, धनदार आणि शानदार असेल 'कौन बनेगा करोडपती 15'. या नव्या पर्वात नाविन्यताही असेल". 'कौन बनेगा करोडपती'चं नवं पर्व स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे.
अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती 15'च्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्यांनी पुन्हा पुन्हा तालीम... फक्त केबीसीसाठी", 'कौन बनेगा करोडपती 15' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज, असं कॅप्शन दिलं होतं.
'कौन बनेगा करोडपती'बद्दल जाणून घ्या...
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची सुरुवात 2000 मध्ये झाली होती. या कार्यक्रमामुळे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. कार्यक्रमातील एक पर्व सोडून बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन यांनी होस्ट केले आहेत. केबीसीचं तिसरं पर्व बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) होस्ट केलं होतं. 'कौन बनेगा करोडपती 15' प्रेक्षकांना सोनी वाहिनीवर पाहायला मिळेल.
संबंधित बातम्या