आपल्या शोमुळे कपिलचे अनेक फॅन्स आहेत. कपिलने ट्वीट केल्यानंतर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच कपिल बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही कपिलवर शुभेच्छांचा वर्षाव केला. कपिलने बाबा झालं असल्याचं ट्वीट करून सांगितल्यानंतर गुरु रंधावानेही कपिलला शुभेच्छा दिल्या, 'शुभेच्छा पाजी; आता मी ऑफिशिअली काका झालो'. याव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटींनी कपिलला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये, सानिया नेहवाल, अनुष्का अरोरा, पुनम महाजन, भुवन बाम, सुरेश रैना, सुनील ग्रोवर, कियारा अडवाणी, दिया मिर्झा, टायगर श्रॉफ यांचा समावेश आहे.
दरम्यान, कपिल आणि गिन्नी यांचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. काही दिवसांपूर्वी कपिल आपली पत्नी गिन्नीला घेऊन बेबीमूनसाठी गेला होता. आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून मागील महिन्यात कपिलने आपल्या शोच्या आगामी एपिसोड्सचंही शुटिंग आधीच केलं होतं.