Malaika Arora and Boney Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. मलायका आणि अर्जुन यांच्या रिलेशनशिपबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. मलायका आणि अर्जुन हे अनेकवेळा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करतात. आता मलायका ही लवकरच अर्जुनचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. कोणत्या कार्यक्रमामध्ये  मलायका आणि बोनी कपूर हे एकत्र स्टेज शेअर करणार आहेत? त्याबद्दल जाणून घ्या...


'या' कार्यक्रमात मलायका आणि बोनी कपूर शेअर करणार स्क्रिन


अर्जुन कपूरचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर हे छोट्या पडद्यावरील झलक दिखला जा या  प्रसिद्ध कार्यक्रमाच्या सेटवर पोहोचले आहेत. रिपोर्टनुसार,  शोच्या आगामी भागात बोनी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. मलायका अरोरा  ही  या कार्यक्रमाची जज आहे . त्यामुळे आता झलक दिखला जा या कार्यक्रमामध्ये बोनी आणि मलायका आरोरा हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.


 झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या सेटवर मलायकाने तिच्या बोल्ड स्टाइलने आणि डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, मलायका आणि बोनी कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.  बोनी कपूर देखील या शोमध्ये डान्स करताना दिसणार आहेत, असं म्हटलं जात आहे.  


बोनी कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट


बोनी कपूर यांनी झलक दिखला जा  या कार्यक्रमाच्या सेटच्या बाहेरील काही फोटो शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "झलक दिखला जा मध्ये पाहुणा म्हणून जाऊन आनंद झाला, त्यांनी मला माझ्या सुरुवातीच्या काळात परत नेले, माझा गेल्या 43 वर्षांचा प्रवास मी पुन्हा पाहिला"






बोनी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध प्रोड्यूसर आहेत. त्यांचा विवाह अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबक झाला होता. बोनी आणि श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करण्याआधी  बोनी यांनी मोना यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. बोनी आणि मोना यांना अर्जुन आणि अंशुला  ही दोन मुलं आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Malaika Arora Birthday: "मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन..."; मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरनं शेअर केली खास पोस्ट