मुंबई : बिग बॉसच्या पाचव्या सीजनमधून जान्हवी किल्लेकर बाहेर पडल्यानंतर आता नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्राचा निर्णय आधीच जान्हवीला समजला होता, चांगला निर्णय घेतला अशा प्रतिक्रियांचा पाऊस आता सोशल मीडियावर पडतोय. तर बिग बॉसच्या घरातही तशीच वागत होती, बाहेर जातानाही तिच्या मूळ स्वभावात काही बदल झाला नाही अशा आशयाच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पडत आहेत.


बिग बॉसच्या पाचव्या सीजनमध्ये जान्हवी किल्लेकर ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. पण तिने 9 लाख रुपये घेऊन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचं म्हणजे जान्हवीने घेतलेला हा निर्णय एकदम योग्य ठरल्याचं दिसून आलं. कारण एकूण सहा स्पर्धकांमध्ये सर्वात कमी मतं ही जान्हवीला मिळाली होती. त्यामुळे तिने जर पैसे घेतले नसते तर ती तशीही बाहेरच पडणार होती. जान्हवी बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. 


सोशल मीडियावर काय कमेंट आल्या? 


हुशार जान्हवी एकदम really task queen.


महाराष्ट्राचा निर्णय जान्हवीला अधिकच समजला होता.


एक नंबर डिसिजन घेतलं आहे जान्हवीने.


अत्यंत वाईट सदस्य जेलमधून बाहेर आल्यावर वाटलं ही सुधारली, पण ती तिचा मूळ स्वभाव बदलत नाही


अतिशय योग्य निर्णय 


एक नंबरची मूर्ख, बेशिस्त आणि बावळट आहेस तू... तुझे व्हिडीओ पण बघायची इच्छा होत नाही.


घरात जायच्या आधी विलन होतीस आणि बाहेर पण विलन म्हणूनच आलीस. लोकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरली आहेस तू.


खूप मनं जिंकली तू जानव्ही 


 






कोण आहे जान्हवी किल्लेकर? 


जान्हवीने छोट्या पडद्यापासून सुरुवात केली आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत जान्हवी खलनायिकेच्या भूमिकेत होती. त्याचप्रमाणे ती एक उत्तम नर्तिका देखील आहे. आतापर्यंत मालिकांच्या माध्यमातून जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यानंतर जान्हवीने बिग बॉसच्या घरातही एन्ट्री केली. अगदी तिचा प्रवास ग्रँड फिनालेपर्यंत आला होता. पण आता तिचा प्रवास इथेच संपला आहे. 


बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला 28 जुलैपासून सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले.  


ही बातमी वाचा :