मुंबई: 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीनं काल (शुक्रवारी) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, सुत्रांच्या मते, प्रत्युषाच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्या आहेत.


 

प्रत्युषाचा मित्र (अभिनेता एजाज खान)

 

दरम्यान, प्रत्युषाचा खास मित्र आणि तिच्यासोबत काम करणारा एजाज खानने प्रत्युषाची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. 'प्रत्युषा फारच धीट मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. तसंच प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज हा या घटनेपासून फरार आहे. तसंच तो प्रत्युषाचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्युषाची हत्याच झाली असावी.' असा आरोप एजाज खाननं केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या काही खास मित्रांनी सांगितलं की, 'प्रत्युषा मागील काही दिवसांपासून खूपच निराश होती. काम न मिळणं, पैशाची चणचण आणि वारंवार बॉयफ्रेंडसोबत होणारे वाद यामुळे ती फारच त्रासून गेली होती.'

 

प्रत्युषाची जवळील अभिनेत्री मैत्रीण डॉली बिंद्रानं सांगितलं की, "रुग्णालयात प्रत्युषाचे आई-बाबा नव्हते. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राजनं तिच्या काकांना याबाबत माहिती दिली. पण राहुल रुग्णालयात नव्हता. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि प्रत्युषा एकत्र राहत होते."

 

24 वर्षीय प्रत्युषानं बालिका वधू या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली. त्यामुळे प्रत्युषाच्या मृत्युमुळे टीव्ही विश्वात एकच खळबळ माजली आहे.

 

संबंधित बातम्या:

 

'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या