Indrayani Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) इंद्रायणी मालिकेत सध्या बाल कीर्तनकार इंदूचे कीर्तन गावागावांत गाजते आहे. इंदूला बऱ्यापैकी नावलौकिक देखील मिळत आहे. आनंदीबाई इंदूला त्यांना हवं तसं वागविण्यात यशस्वी होत आहेत. पण,व्यंकू महाराजांची साथ असल्यानं आनंदीबाईंच्या मार्गात अजूनही अडथळा आहेच असं म्हणायला हरकत नाही. आनंदीबाईंचा लोभ दिवसेंदिवस वाढतंच आहे. व्यंकू महाराजांनी कानउघडणी करून देखील आंनदीबाईंच्या वर्तनात काहीच बदल दिसून येत नाहीये. पण अश्यातच आता मालिकेत इंदूच्या काका काकूंची एन्ट्री झाली आहे. त्यांच्या येण्यानं आनंदीबाई नाखुश आहेत. 


दुसऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची क्षमता विठुरायाने इंदुकडे दिली, मग तिच्या दुःखात, तिच्या सुखात सहभागी होणारी हक्काची माणस खरंच तिला मिळणार का? कारण, आजवर इंदूचे स्वतःचे असे म्हणण्यासारखे रक्ताच्या नात्यातील कोणीच नव्हते जे तिच्या बाजूने लढतील, तिला तिचा हक्क मिळवून देतील. पण आता काका काकूंच्या येण्याने आनंदीबाईंच्या स्वार्थात आणि पैसे कमावण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. 


काका काकूंच्या येण्यानं इंदूचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंदू त्यांची ओळख तिच्या फँट्या गॅंगशी करून देते, त्यांना घरं दाखवते.  पण, एकीकडे विठूच्या वाडीतील लोकांना त्यांच्यावर संशय येतो आहे. तर, दुसरीकडे काका काकूंना अपत्य नसल्यानं त्यांनी इंदूला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्यंकू महाराज आणि इंदूचं नातं रक्ताचं नसलं तरीदेखील ते बाप-लेकीसारखाचं आहे. 


दरम्यान, अचानक हे काका काकू कुठून आले? त्यांच्या येण्याने इंद्रायणीच्या आयुष्यात  काय परिणाम होईल? काका काकूंच्या रूपात इंदूला मिळणार का नवा आधार? ते इंदूला तिचा हक्क मिळवून देतील का? काका काकूंच्या रूपात इंदूला मिळतील का तिच्या हक्काचे आई-वडील? इंदूवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जिवाभावाच्या लोकांमध्ये काका-काकू त्यांचं वेगळं स्थान निर्माण करू शकतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.                                                                                 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chhaava OTT Release: विक्की कौशलचा 'छावा' ओटीटीवर कधी येणार? कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?