Indian Idol 13 Winner Rishi Singh : 'इंडियन आयडॉल 13'चा (Indian Idol 13) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर अयोध्येच्या ऋषी सिंहने (Rishi Singh) 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीसाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत
'इंडियन आयडॉल 13'च्या 'टॉप 6' स्पर्धकांमध्ये ऋषी सिंह, सोनाक्षी कर, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, शिवम सिंह आणि देवोस्मिता यांचा समावेश होता. ट्रॉफी पटकावण्यासाठी या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर या सर्वांना माहे टाकल ऋषी सिंहने 'इंडियन आयडॉल 13'ची ट्रॉफी पटकावली.
ऋषी सिंहला बक्षीस काय मिळालं?
ऋषी सिंहला 'इंडियन आयडॉल 13'च्या ट्रॉफीसह 25 लाख रुपये आणि मारुती सुझुकी एसयूव्ही ही कार बक्षीस म्हणून मिळाली आहे. तसेच त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्टॅक्टदेखील मिळाला आहे. ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अयोध्येचा लोकप्रिय गायक ऋषी सिंह आज देशभरातील संगीतप्रेमींचा लाडका बनला आहे.
'इंडियन आयडॉल 13'चं हे पर्व खूपच खास होतं. नेहा कक्कर (Neha Kakkar), हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) आणि विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांनी या पर्वाचं परिक्षण केलं होतं. तर आदित्य नारायणने (Aditya Narayan) हे पर्व होस्ट केलं होतं.
विजेतेपद मिळाल्यानंतर ऋषी सिंह म्हणाला... (Indian Idol 13 Winner Rishi Singh)
अयोध्येत राहणारा ऋषी सिंह 'इंडियन आयडॉल 13'मध्ये सहभागी होण्याआधी मंदिरांमध्ये आणि गुरुद्वारामध्ये गाणं गात असे. त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. आता 'इंडियन आयडॉल 13'चा विजेता झाल्यानंतर ऋषी म्हणाला,"इंडियन आयडॉल 13' चा मी विजेता झालो आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे सगळं मला स्वप्नवत वाटत आहे. ऋषी सिंह विजेता झाला असला तर देबिस्मिताने दुसरा आणि चिरागने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांना ट्रॉफीसह पाच लाख रुपयांचा चेक मिळाला आहे.
संबंधित बातम्या