Indian Idol 12 Winner : अखेर तो क्षण आला, ज्याची संपूर्ण भारत आतुरतेनं वाट पाहत होता. इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता (Indian Idol 12 Winner) घोषित करण्यात आला आहे. पवनदीप राजननं इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तर अरुणिता कांजीलाल शोची फर्स्ट रनरअप ठरली. दानिश खान (Danish Khan), शनमुखप्रिया  (Shanmukhpriya), अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal), निहाल तोरो (Nihal Tauro), सयाली कांबळे (sayali kamble) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) इंडियन आयडलचे फायनलिस्ट होते. गायक अनु मलिक, सोनू कक्कड आणि हिमेश रेशमिया यांच्या उपस्थितीत शोचा विनर निवडण्यात आला. 


शोमध्ये पोहोचले नामांकीत पाहुणे 


इंडियन आयडलचा फायनल एपिसोड 12 तासांहून अधिक काळ सुरु राहिला. या दरम्यान कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रापासून कुमार सानू, अल्का यागनिक आणि उदित नारायण यांसारख्या दिग्गज गायकांनी उपस्थिती लावली होती. याव्यतिरिक्त शोमध्ये द ग्रेट खलीही उपस्थित होता. शोमध्ये खलीला पाहून सर्वजण हैराण झाले होते. शोचे जज अनु मलिक, सोनू कक्कडही या दरम्यान उपस्थित होते. परंतु, सोनु कक्कडपूर्वी शो जज करणारी गायिका नेहा कक्कड मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. 


अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी त्यांच्या जादुई आवाजाने 90 च्या दशकात अनेक गाण्यांची भेट दिली


अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी त्यांच्या जादुई आवाजाने 90 च्या दशकात अनेक गाण्यांची भेट दिली. या दोघांनी 'दिल चाहता है' ते 'जाने क्यों' सारखी अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यांची चमकदार केमिस्ट्री फक्त लक्षात ठेवली जाऊ शकत नाही. परंतु, इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या मंचावर दिसून आली.


स्पर्धकांचे एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स 


इंडियन आयडलच्या सेटवर कंटेस्टंटनं आपल्या फरफॉर्मन्सने सर्वांना थक्क केलं. दानिश खान, शनमुखप्रिया, अरुणिता कांजीलाल, निहाल तोरो, सयाली कांबळे आणि पवनदीप राजन यांनी सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. सर्व स्पर्धकांचे कुटुंबियही अंतिम एपिसोडसाठी उपस्थित होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :