मुंबई : तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेल्या प्रसिद्ध रिअॅलिटी शो इंडियन आयडल 11 ला विजेता मिळाला आहे. पंजाबमध्ये राहणारा सनी हिंदुस्तानीने इंडियन आयडल 11 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. तसेच सनीला ट्ऱॉफीसोबतच 25 लाख रूपये बक्षिसाची रक्कमही देण्यात आली आहे. तसेच, टी-सीरीजच्या पुढिल प्रोजेक्टमध्ये गाण्याची संधीही मिळाली आहे.


सनीव्यतिरिक्त शोमध्ये चार आणखी फायनलिस्ट्स - अंकोना मुखर्जी, एड्रिज घोष, रिधम कल्याण आणि रोहित राऊतही होते. सनीने आपल्या गाण्याने चाहत्यांच्या मनावर मोहिनी घातली होती. त्याने 'भर दो झोली मेरी' आणि 'हल्का हल्का सुरूर' यांसारखी अनेक गाणी गायली. अंतिम सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आयुष्मान खुराना आणि नीना गुप्ता यांनीही सनीचं कौतुक केलं. रोहित आणि सनी हे दोघे टॉप 2 फायनलिस्ट होते.





अंकोना मुखर्जी दुसरी रनर-अप झाली आणि तिला 5 लाख रूपयांची बक्षिसाची रक्कम मिळाली. रिधम आणि एड्रिज दोघेही पाचव्या स्थानावर होते त्यांना 3 लाख रूपयांची बक्षिसाची रक्कम मिळाली.


इंडियन आयडल 11च्या ऑडिशनपासूनच सनी चर्चेत होता. त्याचा आवाज प्रसिद्ध गझलकार नुसरत फतेह अली खान यांच्याशी मिळता जुळता असल्याचं अनेकांनी सांगितलं होतं. सनीने ऑडिशनपासूनच परिक्षकांनाही आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं होतं.


एका एपिसोडमध्ये अभिनेता कुणाल केमू सनीच्या गाण्यामुळे फार प्रभावित झाले होते की, त्यांनी भगवान लक्ष्मीचं लॉकेट त्यांना भेट दिली. फक्त कुणालच नाहीतर अजय देवगण आणि काजोलही सनीच्या गाण्याने प्रभावित झाले होते.


अंतिम फेरीमध्ये कृष्ण अभिषेक आणि भारती सिंह हेदेखील उपस्थित होते. हा सीझन नेहा कक्कड आणि निवेदक आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत राहिला.


संबंधित बातम्या : 


स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील कुठलाही भाग वगळणार नाही, खासदार अमोल कोल्हेंकडून स्पष्ट