मुंबई: केवळ सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य वापरणं गुन्हा ठरत नसल्याचं म्हणतं हायकोर्टानं अभिनेता आमीर खानविरोधातील याचिका फेटाळली आहे. 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोमध्ये आमीर खाननं राजमुद्रेचा व्यावसायिक वापर केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता मनोरंजन रॉय यांनी केला होता.


 

याप्रकरणी आमीर खानवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राय यांनी याचिकेद्वारे केली होती. मात्र, उच्च न्यालयानं ही याचिका फेटाळून लावली. राजमुद्रेत अशोक स्तंभ, घोडा, बैल, अशोक चक्र आणि सत्यमेव जयते या शब्दाचा वापर केला जातो.

 

संविधान आणि कायद्याप्रमाणं केवळ 'सत्यमेव जयते' ब्रीद वाक्य म्हणजे राजमुद्रेचा वापर करणं होत नाही असं हायकोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळं हा गुन्हा सिद्ध होत नसल्याचं म्हणतं हायकोर्टानं याचिका फेटाळली.