मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रुस्तम' शुक्रवारी (12 ऑगस्ट) देशभरात प्रदर्शित झाला. टीव्हीवरील विविध शोमध्ये सिनेमाचं प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आख्ख्या बॉलिवूडचं पसंतीचा शो म्हणजे सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'.
अक्षय कुमारला मोठं फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे चाहते त्याच्यासाठी अगदी वेडे होतात. पण 'द कपिल शर्मा शो'मधील दोघे जण मात्र अक्षय कुमारला टाळण्याचा प्रयत्न करत होते. हे दोन कलाकार म्हणजे असगर अली आणि किकू शारदा.
मात्र अक्षयला टाळण्याचं कारण वेगळं आहे. त्यांना अक्षयबद्दल कोणताही प्रॉब्लेम नाही. पण खिलाडी कुमारकडून मार खाण्यापासून वाचण्यासाठी दोघेही त्याला टाळत होते.
अक्षय जेव्हा कपिलच्या सेटवर येतो तेव्हा असगर अली आणि किकू शारदा त्याच्यासोबत चित्रीकरण करण्यास नकार देतात. अक्की सेटवर अनेक स्टंट करतो आणि त्याचा शेवट अली आणि किकूला मारुनच करतो. कदाचित दोन्ही कलाकारांवरील प्रेम दाखवण्याची ही अक्षयची खास स्टाईल असावी. पण यावेळी दोघांनाही अक्षयकडून मार पडेल याची भीती होती.
सुत्रांच्या माहितीनुसार, अक्षय कुमार शूटिंगसाठी सेटवर येणार असल्याचं समजल्यानंतर असगर अली आणि किकू शारदाने चित्रीकरण करण्यास नकार दिला. इतकंच नाही दोघ सेटवर न येता, आपल्या रुममध्येच बसले होते.
हे अक्षयला समजल्यानंतर तो सेटवरुन त्या दोघांना शोधण्यासाठी निघाला. अक्षय आणि त्याच्या बॉडीगार्ड्सनी दोघांना फरफटत सेटवर आणलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि एपिसोडच्या शेवटी दाखवण्यात आला. शूटिंग करण्यास का नकार दिला, असं अक्षयने विचारल्यानंतर किकू आणि अलीच्या उत्तराने सेटवर हशा पिकला.
अक्षय ज्यावेळी सेटवर तेव्हा आम्हाला मारतो, असं उत्तर किकू आणि अलीने दिलं. हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रेक्षकांनाही हसू आवरणार नाही हे नक्की.
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
...म्हणून किकू आणि अलीने अक्षयसोबत शूटिंग करण्यास नकार दिला!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2016 06:05 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -