Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण आता मालिकेतील मुख्य कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नील भट्ट, आयशा शर्मा आणि हर्षद अरोडा आता 'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. 


'गुप है किसी के प्यार मैं' ही मालिका आता 20 वर्षांचा लीप घेणार आहे. अद्याप या संदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी मालिकेचं कथानक 20 वर्षे पूढे सकरणार असल्याची चर्चा आहे. 'गुप है किसी के प्यार मैं' या मालिकेत नील भट्ट विराटच्या भूमिकेत आहे. तर आयशा शर्मा सईच्या भूमिकेत आहे.


मीडिया रिपोर्टनुसार,"गुम है किसी के प्यार मैं' ही मालिका बंगाली नाटक 'कुसुम डोला'वर आधारित आहे. ही मालिका सत्यघटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता या मालिकेच्या कथानकात एक ट्विस्ट येणार आहे. या मालिकेचं कथानक आणखी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावं यासाठी निर्मात्यांनी हा प्रयोग केला आहे". 


'गुप है किसी के प्यार मैं' मालिका 20 वर्षांचा लीप घेणार असल्याने आता मालिकेत नवीन पात्रांची एन्ट्री होणार आहे. पण नव्या कथानकात विराटच्या कुटुंबाचा समावेश आहे. त्यामुळे किशोरी शहाणे, शैलेश दातार. भारती पाटील,  शीतल मौलिक, तन्वी ठक्कर आणि विहान वर्मा या कलाकारांचा यात समावेश आहे. 


ऐश्वर्या शर्माने घेतलाय मालिकेतून निरोप


ऐश्वर्या शर्मा उर्फ पाखीने या महिन्याच्या सुरुवातीलाच 'गुप है किसी के प्यार मैं' या मालिकेतून निरोप घेतला आहे. गेलं दीड वर्ष ऐश्वर्याने पाखीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. याबद्दल माहिती देत ऐश्वर्या शर्मा म्हणाली होती की,'गुप है किसी के प्यार मैं' या मालिकेच्या माध्यमातून मी घराघरांत पोहोचले. पाखीचा प्रसास आता संपला असून अनेक नव्या गोष्टींची शिदोरी सोबत घेऊन मी या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेत आहे".  


रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13'मध्ये ऐश्वर्या शर्मा सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमासाठीच तिने 'गुप है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेतली असा अंदाज वर्तवला जात आहे. आता ऐश्वर्याची स्टंटबाजी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 


संंबंधित बातम्या


Aishwarya Sharma:ऐश्वर्या शर्मानं का सोडली ‘गुम है किसी के प्यार में’ मालिका; 'हे' आहे कारण